लॉकडाउनचे नियम मोडल्याने भिडे गुरुजींविरोधात FIR
सांगली ते कोल्हापूर विनापरवाना प्रवास
by लोकसत्ता ऑनलाइनशिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे अर्थात भिडे गुरुजी यांच्याविरोधात लॉकडाउनचा नियम मोडल्याप्रकरणी FIR दाखल करण्यात आली आहे. IPC कलम १८८ अंतर्गत भिडे गुरुजींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी सांगली ते कोल्हापूर असा प्रवास केला आहे. त्यासाठी त्यांनी कोणतीही संमती घेतली नव्हती त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातून विनापरवाना कोल्हापूर जिल्ह्यातील उदगांव येथे ते आल्याने ही कारवाई आली आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आंतर जिल्हा प्रवेश करण्यास मर्यादा आणल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी प्रशासनाची रीतसर परवानगी घ्यावी लागते. मात्र भिडे गुरुजी यांनी या नियमाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे प्रवेश केल्याने जिल्हा संचारबंदीचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.