Forbes : सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट एकटा क्रिकेटपटू
६६ व्या स्थानावर घेतली झेप
by लोकसत्ता ऑनलाइनभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. २०२० वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या फोर्ब्सच्या १०० खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीला स्थान मिळालं आहे. या यादीत विराट कोहली हा एकटाच क्रिकेटपटू आहे. विराटचं वार्षिक उत्पन्न हे 26 Million अमेरिकन डॉलर्स एवढं असून यातील 24 Million अमेरिकन डॉलर्स एवढं उत्पन्न विराटला जाहीरातींमधून मिळतं. महत्वाची गोष्ट म्हणजे २०१८ साली जाहीर करण्यात आलेल्या यादीत विराट ८३ व्या स्थानावर होता. यानंतर २०१९ साली विराटची या यादीत घसरण होऊन ते १०० व्या स्थानावर फेकला गेला होता. मात्र नवीन वर्षात विराटने चांगली कमाी करत थेट ६६ व्या स्थानावर झेप घेतली आहे.
क्रिकेट व्यतिरीक्त विराट अनेक ब्रँडच्या जाहीराती करतो. ज्यामध्ये PUMA, Audi India, Hero MotoCorp, Philips India, Himalaya, Vicks, Volini अशा नामांकित ब्रँडचा समावेश आहे. याव्यतिरीक्त काही दिवसांपूर्वी विराट आणि त्याची पत्नी अनुष्का e-commerce वेबसाईट Myntra चे ब्रँड अँबेसेडर झाले आहेत. त्यामुळे वार्षिक कमाईच्या बाबतीत विराटने केलेली प्रगती ही वाखणण्याजोगी आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.