‘त्या इंटीमेट फोटोमुळे माझं पतीसोबत झालं भांडण; सुष्मिता सेनच्या वहिनीचा खुलासा
काही दिवसांपूर्वी त्यांनी शेअर केलेल्या इंटीमेट फोटोवरुन त्यांना ट्रोल करण्यात आले होते
by लोकसत्ता ऑनलाइनलॉकडाउनमुळे अनेक चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण बंद आहे.त्यामुळे अनेक कलाकार आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची वहिनी चारु असोपा आणि भाऊ राजीव सेन यांचा एक इंटीमेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर त्या दोघांना ट्रोलही करण्यात आले होते. आता चारुने त्या फोटोंवरुन पतीसोबत भांडण झाल्याचे सांगितले आहे.
नुकताच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला चारुने मुलाखत दिली. ‘फोटो पोस्ट करण्याआधी आमच्यामध्ये काही बोलणे झाले नव्हते. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. पण नंतर आम्हाला कळालं की आम्ही ट्रोल झालो आहोत. त्यानंतर मी राजीवला म्हणाले, “मी फोटो पोस्ट करायला नकार दिला असतानाही तू फोटो पोस्ट केलास. बघ आता आपण ट्रोल झालो.” आमच्यामध्ये भांडण देखील झाले. ट्रोलिंगवर प्रतिक्रिया देण्यात काही अर्थ नसतो. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे असते. आम्ही दोघेही या सगळ्यालाकडे दुर्लक्ष करतो’ असे चारुने म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी राजीवने चारुबरोबरच्या वाईन डेटचे फोटो पोस्ट केले होते. ‘या क्वारंटाइन दिवसाच्या मी प्रेमात आहे.. तुम्ही?’ असे कॅप्शन राजीवने फोटो शेअर करत दिले होते. तसेच या सेल्फी फोटोंमध्ये ते दोघे एकमेकांचे चुंबन घेताना दिसत होते. या फोटोवर चारुने देखील कमेंट केली होती. तिने कमेंट करताना ‘क्वारंटाइनमध्ये आम्ही आनंदात आहोत. घरी राहा. सुरक्षित राहा,’ असे म्हटले होते. त्यांच्या या फोटोवर एका यूजरने हे अती खासगी क्षण सोशल नेटवर्किंगवर शेअर करण्याची गरज नव्हती अशी कमेंट केली होती. तसेच तुम्ही पती-पत्नी असलात तरी बेडरुमधील फोटो शेअर करु नये असे म्हणत नेटकऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.