नवी मुंबईत दिवसभरात वाढले ६५ करोनाबाधित, दोघांचा मृत्यू
एका दिवसात २७७ जणांची केली करोनावर मात
by लोकसत्ता ऑनलाइननवी मुंबईत करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून आज ६५ नवे रुग्ण वाढले आहेत. याचबरोबर शहरात करोनाबाधितांची संख्या १९९६ झाली आहे. तर आज २ जणांचा मृत्यू झाला असून करोनामुळे मृत् पावलेल्यांची आतापर्यंतची संख्या ६३ झाली आहे. शहरातील १हजार ९९६ रुग्णांपैकी तब्बल १हजार १५८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
आज शहरात २७७ जणांनी करोनावर मात केल्याने, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. एकीकडे शहरात दररोज करोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे ५८ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले असल्याने नागरिकांसाठी दिलासादायक गोष्ट आहे. शहरात आतापर्यंत ११ हजार ३०२ जणांची करोना चाचणी करण्यात आली आहे.तर अद्याप ८४६ जणांचे करोना चाचणी अहवाल प्रलंबित आहेत.
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये २६८२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ११६ मृत्यू झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासांमध्ये ८ हजार ३८१ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासात आलेल्या संख्येनंतर आता महाराष्ट्रातील करोना रुग्णांची ६२ हजार २२८ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात २६ हजार ९९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्याच्या घडीला ३३ हजार १२४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.