‘तुझं तोंड बघून मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला’ स्वरा भास्कर झाली सोशल मीडियावर ट्रोल
स्वराने देखील ट्रोलरला सांगलेच सुनावले आहे.
by लोकसत्ता ऑनलाइनबॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियाद्वारे सामाजिक विषयांवार तिचे बिनधास्तपणे मत मांडताना दिसते. अनेकदा तिला या गोष्टीमुळे सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात येते. स्वरा ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देखील देताना दिसते. नुकताच स्वराला एका यूजरने ट्रोल केले आहे. त्यावर तिने त्याला चांगलेच सुनावले आहे.
या यूजरने, ‘जेव्हा जेव्हा तुझा चेहरा पाहतो, तुझा आवाज ऐकतो तेव्हा माझा लग्न करण्याचा विचारच बदलतो. त्यानंतर लग्नाचा विचारही माझ्या डोक्यात येत नाही’ असे म्हटले होते. त्यावर स्वराने उत्तर देत ट्रोलरला चांगलेच सुनावले आहे.
‘चांगली योजना आहे. दुसरं कोणी तुला नकार देण्यापासून तु स्वत:चा बचाव करत आहेस. खूप चांगलं करत आहेस’ असे म्हणत स्वराने त्याला चांगलेच सुनावले आहे. त्यानंतर अनेकांनी या ट्विटवर कमेंट करत स्वराला ट्रोल केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.