https://images.loksatta.com/2020/05/Baahubali-The-Conclusion.jpg?w=830

‘बाहुबली’ची जादू; रशियातील घरांमध्ये घुमतोय ‘जय माहिष्मती’चा आवाज

रशियातील भारतीय दूतावासाने ट्विट करत ही माहिती दिली आहे.

by

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाची संपूर्ण देशात व्हाह व्हाह झाली होती. ‘बाहुबली’ पाठोपाठा ‘बाहुबली २’ य़ा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घातला होता. चित्रपटाने अनेक नवे विक्रम केले होते. आजही हा चित्रपट प्रेक्षक तितकाच आवडीने पाहतात. गेल्या काही दिवसांपासून ‘बाहुबली २’ हा चित्रपट रशियामध्ये टीव्ही चॅनेलवर दाखवण्यात येत आहे.

रशियातील भारतीय दूतावासाने ट्विट करत ही माहिती दिली आहे. ‘भारतीय चित्रपटांची लोकप्रियता रशियामध्ये वाढत चालली आहे. सध्या रशियामध्ये छोट्या पडद्यावर काय दाखवत आहेत पाहा. रशियन भाषेमध्ये सबटायटल असलेला बाहुबली चित्रपट’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच हे ट्विट करत त्यांनी चित्रपटात बाहुबली देवसेनेसोबत दरबारात हजर होत असलेल्या दृश्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये इतिहास रचला होता. या चित्रपटात प्रभाससह अभिनेत्री अनुष्का शेट्टी मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाने जवळपास २५० कोटींची कमाई केली होती. तसेच जगभरामध्ये १८०० कोटींची कमाई केल्याचे म्हटले जाते. देवसेना, अमरेन्द्र बाहुबली, कटप्पा, भल्लालदेव ही पात्र त्यावेळी विशेष चर्चेत होती.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.