https://images.loksatta.com/2020/05/Atharva-Ankolekar-mother-759.jpg?w=830

मुंबईकर क्रिकेटपटूची आई करोनाविरुद्ध लढ्यात बजावतेय आपलं कर्तव्य

वैदेही अंकोलेकर BEST मध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत

by

संपूर्ण देशासह मुंबई शहरालाही करोना विषाणूचा चांगलाच फटका बसला आहे. प्रत्येक दिवश शहरातील महत्वाच्या भागांमध्ये करोनाचे रुग्ण आढळत आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे, तरीही या प्रयत्नात सरकारला म्हणावं तसं यश येताना दिसत नाही. प्रादूर्भाव वाढू नये यासाठी सरकारने लोकल व सर्व सार्वजनिक वाहूतक व्यवस्था बंद ठेवली आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांसाठी मुंबईत बेस्ट बसची सुविधा सुरु आहे. या खडतर परिस्थितीत अनेक कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता काम करत आहेत. U-19 विश्वचषकात भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व कलेल्या मुंबईकर अथर्व अंकोलेकरची आईही या परिस्थितीत आपलं कर्तव्य बजावत आहे.

वैदेही अंकोलेकर या मुंबई महापालिकेच्या बेस्ट या परिवहन सेवेत काम करतात. “सध्याच्या खडतर काळात पोलीस, बीएमसीचे कर्मचारी, डॉक्टर, नर्स यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहचवणं ही माझी जबाबदारी आहे. सध्या लोकल ट्रेन बंद असल्यामुळे हे सर्व कर्मचारी बेस्टच्या सेवेवर अवलंबून आहेत. अशावेळी मी या लोकांच्या सेवेत आपलं योगदान देऊ शकतेय याचा मला अभिमान आहे. सध्या अंधेरी ते विरार या मार्गावर माझी ड्युटी आहे. सर्वसाधरणपणे बेस्टच्या बस विरारपर्यंत जात नाहीत, पण या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ही खास सोय आहे.” वैदेही टाइम्स ऑफ इंडियशी बोलत होत्या. करोनाचा प्रादूर्भाव होण्याची भीती असतानाही आपल्या परिवारासाठी या गोष्टी करणं गरजेचं असल्याचं वैदेही यांनी सांगितलं. मात्र अद्याप बेस्ट कर्मचाऱ्यांना विम्याची सुरक्षा मिळालेली नसल्याचंही वैदेही यांनी सांगितलं.

बेस्टमध्ये काम करत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झालेली आहे. या भीतीमुळे अथर्व मला अनेकदा कामावर जाऊ देत नाही. काही दिवसांपूर्वी आम्ही राहत असलेल्या बिल्डींगमध्ये एक करोना बाधित रुग्ण सापडल्यामुळे बिल्डींग सिल करण्यात आली. पण कामावर गेले नाही, तर सुट्टी लावली जाईल. असं करुन कसं चालेल?? सध्याच्या काळात मला पूर्ण पगार मिळणं गरजेचं आहे. मी कशीबशी त्याची समजूत काढून कामावर जात आहे, वैदेही अथर्वबद्दल सांगत होत्या. आतापर्यंत ८ बेस्ट कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशावेळी आपल्याला आरोग्य विम्याचं कवच मिळाल्यास माझ्या परिवारावाला थोडीशी मदत होईल असं मत वैदेही यांनी व्यक्त केलं.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.