https://images.loksatta.com/2020/05/Ajit-Jogi.jpg?w=830

छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन

हृदयविकाराचा झटका आल्याने अजित जोगी यांचे निधन

by

छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. अजित जोगी ७४ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ९ मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत विशेष सुधारणा झाली नाही. काही दिवसांनी त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं. त्यानंतर ते कोमात गेले होते. आज त्यांना पुन्हा एकदा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. अजित जोगी यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र अमित जोगी यांनी ANI ला दिली आहे.

कोण होते अजित जोगी?

राजकारणात येण्यापूर्वी अजित जोगी यांनी सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण केली होती. तसंच ते तहसीलदार या पदावर कार्यरत होते. १९८८ च्या जवळपास त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती येण्यापूर्वी त्यांनी खासदार म्हणूनही काम केलं आहे. छत्तीसगढच्या निर्मितीनंतर त्यांनी २०००- २००३ या कालावधीत मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेतली होती. २०१६ मध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांसोबत वाद झाल्यानंतर त्यांनी जनता काँग्रेस छत्तीसगढ असा आपला पक्ष स्थापन केला होता.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.