https://images.loksatta.com/2020/05/police-21.jpg?w=830

नवरा-बायकोचा वाद सोडवणं पडलं महागात, त्यानं बायकोला सोडलं अन् पोलिसालाच केली मारहाण

नागपुरमध्ये पोलिसाला मारहाण, आरोपीला ठोकल्या बेड्या

by

नागपुरात नवरा बायकोचा वाद सोडवायला जाणं पोलिसाला चांगलेच महागात पडले आहे. हजारीपहाड परिसरात कोलबास्वामी नगरमध्ये आरोपी नितीन अनिल पारोचे याचं बायकोबरोबर भांडण सुरू होतं. दररोजच्या भांडणाला कंटाळून अनिलच्या नितीनच्या वडिलांनी पोलिसांना फोन केला. पोलिस हवालदार रोनाल्ड मार्टिन अँथोनी (वय ५५ ) घटनास्थळावर पोहचले.

अँथोनी यांनी अनिलची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. ते त्याच्या वडिलाशी चर्चा करीत असताना अनिलचा पारा चढला. त्याने थेट हवालदारावर हल्ला करत मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करून अनिलला ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरुवारी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन अनिल पारोचे कुटुंबासह हजारीपहाड परिसरात राहतो. गुरुवारी सकाळी अनिलचा पत्नीशी वाद झाला. सकाळी आठ वाजतापासून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण सुरू होते. अनिलने वडिलांवरही मारण्यासाठी धावला. शेजाऱ्यांनी हस्तक्षेप करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता अनिलने त्यांनाही शिवीगाळ केली. त्यामुळे त्यांनी पोलिसाला फोन केला. त्यानंतर घटनास्थळावर पोलिस हवालदार रोनाल्ड मार्टिन अँथोनी दाखल झाले. अँथोनी यांनी अनिलची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अनिल काही केल्यास ऐकायला तयार नव्हता. अँथोनी यांनी त्याला अन्य पोलिसांच्या मदतीने गाडीत बसविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी अनिलने अँथोनी यांना मारहाण केली. अखेर पोलिसांनी अनिलला अटक करून पोलिस स्थानकात दाखल केलं.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.