
‘अन्नच नाही, बाळाला काय खाऊ घालायचं?’ एका आईची आर्त हाक
लोकमान्य टिळक टर्मिनसबाहेर मजुरांची गर्दी
by लोकसत्ता ऑनलाइनआमच्याकडे अन्नच नाही आता आम्ही काय खायचं आणि बाळाला काय खाऊ घालायचं? असा प्रश्न आईने विचारला आहे. मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनसबाहेर आज स्थलांतरित मजुरांची गर्दी जमली. त्यातल्या एका स्थलांतरित मजूर महिलेने हा प्रश्न विचारला आहे. ही महिला म्हणते, “मला १२ एप्रिल रोजी बाळ झालं. आता आमच्याकडे खायला अन्नही उरलेलं नाही. आम्ही खायचं? आणि बाळाला काय खाऊ घालायचं? आमची सरकारला विनंती आहे की आम्हाला तातडीने बिहारला आमच्या घरी पोहचवा”
सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या काळात सर्वाधिक हाल होत आहेत ते स्थलांतरित मजुरांचे. अनेक मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यात आलं आहे. मात्र अजूनही अनेक मजूर महाराष्ट्रात अडकून पडले आहेत. आज मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी अनेक मजूर जमा झाले. बिहारला जाण्यासाठी त्यांनी गर्दी केली. अशावेळी एका मजूरकाम करणाऱ्या एका महिलेने अन्न संपलं असल्याची खंत बोलून दाखवलं आहे. तसंच आम्ही काय खाणार आणि बाळाला काय खाऊ घालणार असंही या महिलेने विचारलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.