धोनी आणि डीव्हिलियर्सलाही लाजवेल असा अजब फटका आणि थेट SIX
व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल चकित
by लोकसत्ता ऑनलाइनभारतामध्ये ‘क्रिकेट’ हा धर्म मानला जातो. देशातील प्रत्येकाला क्रिकेटची आवड आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत क्रिकेट खेळतोच. गल्ली क्रिकेटमधील काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. असाच स्थानिक क्रिकेटमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. व्हिडिओमधील फलंदाजाची षटकार मारण्याची अजब स्टाइल पाहून धोनी, डीव्हिलियर्सलाही लाजवेल अशी आहे.
सचिन, धोनी, युवराज, आफ्रिदी आणि डीव्हिलियर्ससारख्या दिग्गज फलंदाजाच अफलातून क्रिकेट शैलीसाठी ओळखले जातात. त्याचप्रमाणे व्हायरल व्हिडिओमधील तरूण त्याच्या हटके आणि धमाकेदार फलंदाजी स्टाइलमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओला ६० लाखांपेक्षा जास्त व्हिव्ज आहेत. या तरूणाने नेटकऱ्यांची मने जिंकली आहे. धोनीच्या हॅलिकॉप्टर शॉटच्याही पलीकडे जात एक दमदार फटका मारत चेंडू सीमारेषपलीकडे पाठवल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.
@shameersyamdifferent shot ##cricketlover♬ original sound – iqbal Kandiga
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.