https://images.loksatta.com/2020/05/India-Nepal-1.jpg?w=830

भारताने नेपाळला खडसावलं; “चर्चा नंतर, आधी…”

नव्या विधेयकाला नेपाळमध्येच पाहावी लागतेय वाट

by

काही दिवसांपासून भारत आणि नेपाळदरम्यान भूभागावरून तणावाचं वातावरण आहे. भारतातील काही भूभाग नेपाळनं आपले असल्याचा दावा करत ते नेपाळच्या नकाशात सामिल करणार असल्याचं म्हटलं होतं. तसंच नेपाळच्या पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. परंतु त्याला नेपाळच्या संसदेपर्यंत हे विधेयक पोहोचलं नसल्याची माहिती आता समोर आले. त्यानंतर आता नेपाळनं पुन्हा एकदा भारताकडे चर्चेची मागणी केली आहे. परंतु दोन्ही देशांमध्ये विश्वासाचं संकट निर्माण झालं असून नेपाळनं पहिल्यांदा भारताचा विश्वास पुन्हा संपादन केला पाहिजे, असं मत भारताकडून व्यक्त करण्यात आलं आहे.

नेपाळनं कालापानी सीमेच्या मुद्द्यावर परराष्ट्र सचिव स्तरावर चर्चेची मागणी केली आहे. तर दुसरीकडे यासोबतच नव्या नकाशाला मंजुरी देण्यासाठी संविधानात संशोधन करण्याचेही प्रयत्न सुरू ठेवले आहेत. भारताशी चर्चेपूर्वी नेपाळनं पुन्हा विश्वास संपादन केला पाहिजे आणि चांगलं वातावरण तयार झालं पाहिजे, असं भारताचं म्हणणं आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. पंतप्रधान के.पी.ओली यांच्या सरकारनं नव्या नकाशाला मंजुरी मिळवण्यासाठी तयार केलेलं विधेयक अद्याप संसदेत सादर केलं नाही. नेपाळचा प्रमुख विरोधी पक्ष नेपाळी काँग्रेसनं याप्रकरणी अधिक वेळ मागितला आहे. तर दुसरीकडे मधेशी समुदायाचनं प्रस्तावित संशोधनात त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

नेपाळमध्ये हे प्रकरण गंभीरतेनं घेतलं जात आहे. तसंच भारतानंदेखील ते पाहिलं आहे. “भारत आपल्या शेजारी राष्ट्रांसोबत परस्पर सन्मानाच्या भावनेनं चर्चा करण्यासाठी तयार आहे. ही एक सुरू राहणारी प्रक्रिया आहे आणि त्यासाठी रचनात्मक आणि सकारात्मक प्रयत्नांची आवश्यकता आहे. नेपाळसोबत सतत चर्चा सुरू आहे,” अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली.

सतत चर्चा सुरू

यापूर्वी परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांनी यापूर्वीच नेपाळचे राजदूत निलांबर आचार्य यांची भेट घेतली आहे. नेपाळ प्रकरणांवर लक्ष ठेवून असलेले संयुक्त सचिव (उत्तर) पीयूष श्रीवास्तव यांनीदेखील आचार्य यांची भेट घेतली असून त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेनंतर भारतानं नवा नकाशा जारी केला होता. तेव्हापासूनच नेपाळ कालापानीबाबत चर्चांवर भर देण्याचा प्रयत्न करत आहे.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.