https://images.loksatta.com/2020/05/WhatsApp-Image-2020-05-29-at-11.39.11-AM.jpeg?w=830

सोनू सूदचं मदतकार्य पाहून भारावला अजय देवगण; म्हणाला…

गरजुंच्या मदतीसाठी अभिनेता सोनू सूद पुढे सरसावला आहे

by

देशात लॉकडाउन घोषित झाल्यानंतर परराज्यातून मुंबईत कामानिमित्त आलेले मजूर त्यांच्या गावी परत जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यात प्रत्येक जण त्याला शक्य होईल त्या वाहनाने किंवा चालत गावी निघाला आहे. त्यामुळे या गरजुंच्या मदतीसाठी अभिनेता सोनू सूद पुढे सरसावला आहे. त्याने या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी बसची सोय केली आहे. सोनूचं हे मदतकार्य पाहून सर्व स्तरावर त्याचं कौतूक होत असून कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी भारावून गेले आहेत. यात अभिनेता अजय देवगणने देखील सोनूचं काम पाहून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

अजयने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत सोनूचं कौतूक करत, त्याच्या मदतकार्याला अजून यश मिळो अशी इच्छा व्यक्त केली आहे.” प्रवासी मजुरांना सुरक्षितरित्या त्यांच्या घरी पाठविण्याचे जे काम करत आहेस, ते खरंच एक उत्तम उदाहरण आहे. तुला या कार्यात अजून यश आणि मनोबल वाढो हीच इच्छा, सोनू”, असं ट्विट अजय देवगणने केलं आहे.

दरम्यान, सोनू सूद गेल्या कित्येक दिवसापासून परराज्यातून आलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी व्यवस्था करत आहे. आतापर्यंत त्याने हजारोंच्या संख्येने मजुरांना त्यांच्या गावी पाठविली आहे. त्यामुळे त्याच्या या कार्याचं सर्व स्तरांमधून कौतूक होत आहे.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.