https://images.loksatta.com/2020/05/Accident-1.jpg?w=830

मुंबई गोवा महामार्गावर अपघात; एक ठार, तीन जखमी

गाडीचे टायर फुटल्यामुळे झाला अपघात

by

मुंबई गोवा महामार्गावर आज, शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एक जणाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील हमरापूर पुलावर आज सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास तवेरा गाडीला भीषण अपघात झाला. यामध्ये एक तरुणी जागीच ठार झाली तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत . जखमींवर पेणच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कुडाळ येथून मुंबईतील माहीमला निघालेली तवेरा गाडी हमरापूर येथील पुलावर आली असता टायर फटल्यामुळे अपघात झाला. टायर फुटल्यानंतर गाडी दुभाजकावर आदळली. या अपघातामध्ये गाडीचंही मोठं नुकसान झालं आहे. भीषण अपघातामधून पाच वर्षाची चिमुकली बचावली आहे.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.