https://images.loksatta.com/2020/04/corona-virus-3.jpg?w=830
संग्रहित छायाचित्र

चिपळुणातील रुग्णालय कर्मचाऱ्याला करोनाची लागण

गेले दोन महिने शहरात करोनाचा एकही रूग्ण आढळून आला नव्हता

by

शहरातील मार्कंडी भागात राहणाऱ्या रूग्णालय कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्याचे तपासणीमध्ये निष्पन्न झाले आहे.

ही तरूण व्यक्ती लोटे – परशुराम येथील एका रूग्णालयात कामाला आहे. दोन दिवसांपूर्वी त्याने करोनाची चाचणी केली होती. त्याचा चाचणी अहवाल बुधवारी रात्री पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच गुरूवारी  सकाळपासून काविळतळी व मार्केंडी भागाची सीमा बंद करण्यात आली आहे. याठिकाणी पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला असून पालिकेकडून तातडीने औषध फवारणी सुरू करण्यात आली. परिसरातील नागरिकांचा सव्‍‌र्हे करून त्यांच्याही चाचण्या घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच संबंधित रूग्णाच्या नातेवाईकांच्याही चाचण्या घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

गेले दोन महिने शहरात करोनाचा एकही रूग्ण आढळून आला नव्हता. मात्र सध्या चालू असलेल्या टाळेबंदीच्या चौथ्या टप्यात करोनाचा शहरातील पहिलाच रूग्ण नोंदवला गेला आहे .

व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार प्रशासनाने शहरातील बाजारपेठ खुली करण्याचा निर्णय नुुकताच घेतला. मात्र आता करोनाबाधित रूग्ण आढळल्यामुळे नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. त्याचा परिणाम बाजारपेठेवर होण्याची शक्यता आहे.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.