अवैध टिल्लू पंपाविरुध्द कडक कारवाई करा : झलके
by Nagpur Today, Nagpur Newsनागपूर : नागरिकांनी अवैधरित्या लावलेल्या टिल्लू पंपाविरुध्द कडक कारवाई करण्याचे निर्देश मनपाच्या स्थायी समिती सभापती तथा जलप्रदाय समितीचे सभापती श्री.विजय (पिंटू) झलके यांनी दिले आहेत. गुरुवारी (ता.२८) त्यांनी पाणी समस्येबाबत नेहरुनगर झोन, हनुमाननगर झोन आणि धंतोली झोन मध्ये बैठक घेतली. बैठकीला उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे, जलप्रदाय समितीचे उपसभापती भगवान मेंढे आणि झोनचे नगरसेवक/नगरसेविका उपस्थित होते.
पाणी समस्येबाबत आढावा घेतल्यानंतर श्री.झलके यांनी नेहरुनगर झोन मध्ये प्रभाग २६, २७, २८ आणि ३० मध्ये पाणी पुरवठा वाढविण्याचे निर्देश दिले. हनुमाननगर झोन मधील प्रभाग ३४ मध्ये सुरु असलेल्या अमृत योजनेचे काम लवकरात-लवकर पूर्ण करणे आणि नागरिकांना नळाचे कनेक्शन देण्याचे निर्देश दिले. तसेच रामबाग आणि रेशीमबाग येथील पाणी पुरवठयाबाबत तक्रारी तात्काळ सोडविण्याचे निर्देश दिले.
आढावा बैठकीत धंतोली झोन सभापती लता काडगाये, डॉ.रविन्द्र भोयर, हर्षला साबळे, विजय चुटेले, प्रमोद चिखले, मनोज गावंडे, भारती बुंदे, नेहरुनगर झोन मध्ये प्रतोद दिव्या धुरडे, समिता चकोले, मंगला गवरे, स्नेहल बिहारे, रेखा साकोरे, हनुमाननगर झोनमध्ये हनुमाननगर झोन सभापती माधुरी ठाकरे, बांधकाम समिती अध्यक्ष अभय गोटेकर, राजेन्द्र सोनकुसरे, मंगला खेकरे, कल्पना कुंभलकर, नागेश मानकर, अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, ओसीडब्लू चे संजय रॉय, के.एम.पी.सिंग, राजेश कालरा आणि डेलीगेट उपस्थित होते.