आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २९ मे २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
by लोकसत्ता ऑनलाइनमेष:-उत्तम वाहन सौख्य लाभेल. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. झोपेची तक्रार दूर होईल. घरातील वातावरणात प्रसन्नता राहील. आवडी-निवडी बाबत ठाम राहाल.
वृषभ:-जोमाने कामे पूर्ण कराल. प्रवासाची आवड अंशत: पूर्ण होईल. चांगले साहित्य वाचनात येईल. वैचारिक दर्जा सुधारता येईल. मानसिक चांचल्य जाणवेल.
मिथुन:-फक्त स्वत:चा विचार करून चालणार नाही. नवीन गुंतवणूक कराल. सेवेचे महत्व लक्षात घ्यावे. इतरांच्या आनंदात सहभागी व्हावे. अघळ-पघळ गप्पा मारल्या जातील.
कर्क:-मनातील भलते-सलते विचार बाजूला सारावेत. आनंदी दृष्टीने वागावे. ध्यानधारणा करावी लागेल. मन:शांती महत्त्वाची आहे हे लक्षात घ्या. उष्णतेचा त्रास जाणवेल.
सिंह:-योग्य संधीची वाट पहावी. धार्मिक स्थळांना भेट देता येईल. तुमच्या हातून दान धर्म केला जाईल. चोरांपासून सावध रहा. काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात.
कन्या:-उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. व्यापारी वर्गाच्या आकांक्षा पूर्ण होतील. कमिशन मधून मिळणार्या लाभाचा फायदा घ्या. वरिष्ठांची नाराजी दूर करावी. अती अपेक्षा ठेवू नका.
तूळ:-कामात वडिलांची मदत होईल. व्यावसायिक स्थैर्य जपावे. नसते धाडस अंगाशी येवू शकते. कामातील चिकाटी सोडू नये. आर्थिक व्यवहार जपून करावेत.
वृश्चिक:-योग्य मार्गदर्शनाचा लाभ होईल. एखादी नवीन संधी चालून येवू शकते. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कौटुंबिक प्रश्न फार चिघळू देवू नका. प्रवासात योग्य खबरदारी घ्यावी.
धनू:-जुन्या कामातून लाभ होईल. कमी श्रमात कामे केले जातील. जुगार खेळताना सावध रहा. आरोग्यात काहीशी सुधारणा होईल. हाता पायाला किरकोळ इजा संभवते.
मकर:-उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. शांत व संयमी विचार करा. बोलतांना शब्द जपून वापरावेत. काटकसरीवर भर द्यावा लागेल. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते.
कुंभ:-घाईघाईने निर्णय घेऊ नयेत. नातेवाईकांची योग्य वेळी मदत मिळेल. हाताखालील नोकरांचे सौख्य लाभेल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. डोकेदुखीचा त्रास संभवतो.
मीन:-बुद्धी कौशल्याच्या जोरावर कामे घ्यावीत. प्रेम सौख्यात वाढ होईल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. जुगाराची आवड जोपासली जाईल. अधिकाराची जाणीव ठेवून वागा.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.