https://images.loksatta.com/2020/05/Untitled-23.jpg?w=830
संग्रहित छायाचित्र

उत्तर प्रदेशात साडेपाच लाख कामगार रवाना

महाराष्ट्रातून १९ राज्यांमध्ये कामगार रवाना झाले आहेत.

by

टाळेबंदीत रेल्वेने सोडलेल्या श्रमिक गाडय़ांमधून महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला सर्वाधिक म्हणजे ५ लाख ४६ हजार स्थलांतरित कामगार रवाना झाले. या खालोखाल बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगालला जाणाऱ्या कामगारांची संख्याही लक्षणीय आहे. महाराष्ट्रातून १९ राज्यांमध्ये कामगार रवाना झाले आहेत.

टाळेबंदीमुळे शहरात आसरा नसलेल्या, खाण्यापिण्याची भ्रांत असलेल्यांकरिता १ मेपासून श्रमिक गाडय़ा सोडण्यास सुरुवात झाली. केंद्र आणि राज्य सरकारच्या कृपेने रेल्वे प्रवास मोफत झाल्याने आता मुंबईत स्थायिक झालेले, रीतसर घर असलेले परप्रांतीयही कु टुंबकबिल्यासह गावाची वाट धरू लागले आहेत. त्यामुळे राज्याबाहेर जाणाऱ्या गाडय़ांना दररोज तोबा गर्दी असते. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यातील वादामुळे गेल्या चार दिवसांत परप्रांतांत गाडय़ा सुटण्याचा वेग वाढला. राज्यातून आतापर्यंत ७०० हून अधिक गाडय़ा सुटल्या असून १० लाखांपेक्षा अधिक प्रवासी रवाना झाले आहेत. आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, के रळ, मणिपूर, ओदिशा, तमिळनाडू, त्रिपुरा, उत्तराखंड आदी राज्यांतील कामगारही रेल्वे गाडय़ांनी आपल्या राज्यांमध्ये गेले आहेत. राज्यातून गुरुवारी पश्चिम, मध्य रेल्वे, कोकण आणि दक्षिण मध्य रेल्वे (नांदेड विभाग) दिवसभरात ३० श्रमिक गाडय़ा सोडण्याचे नियोजन होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत १५ गाडय़ा सुटल्या होत्या. कल्याण येथून जौनपूर, भदौरी, गोरखपूरसाठी, तर एलटीटी टर्मिनसवरून दोन गाडय़ा लखनौसाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दरभंगा आणि पश्चिम बंगालमधील मुशिराबादसाठी गाडय़ा सुटल्या, तर पनवेलमधून रात्री ओदिशा आणि लखनौसाठी गाडय़ा रवाना के ल्या जाणार होत्या. एलटीटी व सीएसएमटी येथे श्रमिक गाडय़ांसाठी गर्दी होती. मात्र गेल्या तीन दिवसांपेक्षा ही गर्दी काहीशी नियंत्रणात होती. कोकणातूनही बिहार, उत्तर प्रदेशसाठी गाडय़ा सुटल्याचे सांगण्यात आले.

कामगारांची राज्यनिहाय संख्या

राज्य                  कामगार

*   उत्तर प्रदेश          ५ लाख ४६ हजार

*   बिहार               २ लाख ७० हजार

*  झारखंड              ४६ हजार

*  मध्य प्रदेश         ३९ हजार ६००

*  राजस्थान              २२ हजार १००

*  प. बंगाल            ३५ हजार

*  जम्मू-काश्मीर                   ४ हजार५००

*  गुजरात                        २ हजार ६००५

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.