https://images.loksatta.com/2020/05/Rain-Image-1.jpg?w=830
संग्रहित छायाचित्र

पुण्यात वादळी पावसाची शक्यता

मेअखेर आणि जूनची सुरुवात पूर्वमोसमी पावसाने

by

मेअखेर आणि जूनची सुरुवात पूर्वमोसमी पावसाने

पुणे : कोरडय़ा हवामानाच्या स्थितीमुळे राज्यासह पुण्यातही ुवाढलेल्या तापमानाच्या पाऱ्यात  घट होत असून, पुन्हा पूर्वमोसमी पावसाचे संकेत मिळाले आहेत. मे महिन्याची अखेर आणि जूनची सुरुवात शहरात वादळी पावसाने होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

राजस्थानपासून मध्य भारतामध्ये तीव्र उष्णतेची लाट निर्माण झाल्यानंतर तेथून अतिउष्ण वारे महाराष्ट्राकडे आले. परिणामी विदर्भासह राज्याच्या बहुतांश भागात उष्णतेची तीव्र लाट आली होती. विदर्भात अद्यापही  असली, तरी इतर भागांत ती सौम्य झाली आहे. मध्य महाराष्ट्रात आणि पुण्यातील कमाल तापमानातही या काळात वाढ झाली होती. २३ ते २५ मे या कालावधीत शहरातील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास आणि त्यापुढेही गेले.   गेल्या तीन दिवसांपासून तापमानात सुमारे तीन अंशांनी घट झाली आहे. शहरातील  सध्या अंशत: ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.अंदमानच्या समुद्रातून सध्या मोसमी वाऱ्यांना चालना मिळाली आहे.  ३१ मेपासून अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. ४ जूनपर्यंत हे क्षेत्र तीव्र होत जाणार आहे. त्याचा परिणाम  राज्याच्या विविध भागांत पावसाची हजेरी असेल.  वेधशाळेच्या अंदाजानुसार शहरातही सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता  आहे.

शहरात पाऊस कधी?

पुणे वेधशाळेकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुणे शहर आणि परिसरामध्ये २९ मेपर्यंत दुपारनंतर आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे. ३० मे रोजी दुपारनंतर आकाश सामान्यत: ढगाळ राहून मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ३१ मेपासून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. ३१ मेपासून ३ जूनपर्यंत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.