https://images.loksatta.com/2020/05/pun03-7.jpg?w=830

चूक उड्डाणपूल पाडून नव्हे, तर पर्यायांच्या माध्यमातून सुधारावी

जलसंपदा विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. दि. मा. मोरे यांचे मत

by

जलसंपदा विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. दि. मा. मोरे यांचे मत

पुणे : सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठ चौकातील आणि ई-स्क्वेअर जवळील उड्डाणपूल पाडून चूक सुधारण्याऐवजी अन्य पर्यायांच्या माध्यमातून ती दुरुस्त करता येऊ शकते. उड्डाणपूल पाडण्याचा मोठा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांची समिती नेमणे, त्यांच्या शिफारशींचा अभ्यास करून शक्य पर्यायांचा साधक-बाधक विचार करून योग्य तो पर्याय लोकांपुढे ठेवणे अपेक्षित होते. विद्यापीठ चौकातील वाहतूक आणि उड्डाणपुलाच्या शेवटच्या भागात काही दुरुस्ती करून वाहतुकीचा गुंता सोडविता आला असता, असे मत जलसंपदा विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. दि. मा. मोरे यांनी व्यक्त केले.

महापालिके ने पुणे विद्यापीठ चौकात पंधरा वर्षांपूर्वी ४० कोटी रुपये खर्च करून उड्डाणपूल बांधले आहेत. मात्र या उड्डाणपुलात दोष असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ते पाडून नव्याने दुमजली उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. राज्य शासनानेही या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. नवीन उड्डाणपुलाच्या खर्चातील कोणताही वाटा राज्य सरकार उचलणार नाही. दुमजली पूल उभारणीसाठी २४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून टाळेबंदीच्या काळात हे दोन्ही पूल पाडण्याचे नियोजन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) करण्यात आले आहे. उड्डाणपूल पाडण्याच्या या निर्णयावर शहरात पडसाद उमटत असतानाच डॉ. दि. मा. मोरे यांनी उड्डाणपूल न पाडता चूक दुरुस्त करता येऊ शकते, असे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

ते म्हणाले की, उड्डाणपूल पाडण्याऐवजी याला काही पर्याय आहेत का, याबाबत चाचपणी करणे हिताचे ठरणार आहे. त्याअंर्तगत शहरातील काही तज्ज्ञांनीही काही दुरुस्ती करून वाहतुकीचा गुंता सोडविता येईल, असे स्पष्ट के ले आहे. मात्र प्रशासनाशिवाय अन्य कोणाला काही कळत नाही, या अहंकारी विचारातून तज्ज्ञांचे सल्लेही घेण्यात आलेले दिसत नाहीत. उड्डाणपूल पाडण्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मनात घोळत आहे. मेट्रोचे सबळ कारण त्यांना मिळाले आहे, अशी शंका यानिमित्ताने पुढे येत आहे. बांधकामात झालेल्या चुका तोडून-फोडूनच दुरुस्त करता येतात, असे नाही. तर अनेक वेळा आवश्यक त्या सुधारणा करूनही दूर करता येतात. त्यामुळे काही पर्यायांचा विचार होणे अपेक्षित आहे.

विद्यापीठ ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका विद्यापीठाकडील बाजूने घेऊन जाता येईल. मात्र त्यासाठी काही ठिकाणी खासगी जागा संपादित करावी लागेल. विद्यापीठापासून मेट्रो मार्गिके ला सेनापती बापट रस्त्याने नळस्टॉप चौकात जोडता येईल. विद्यापीठ ते शिवाजीनगर मेट्रो भूमिगत करण्याचाही पर्याय आहे. यासाठी विद्यापीठाकडूनही जागा मिळण्याची शक्यता आहे. भूमिगत मेट्रोचा खर्च जास्त असला तरी खर्चाचा ताळेबंद मांडता येईल. हिंजवडीपासून येणारी मेट्रो विद्यापीठाजवळच थांबवून विद्यापीठ ते शिवाजीनगर शटल सव्‍‌र्हिस अशा पर्यायांपैकी आर्थिक, तांत्रिक आणि सामाजिक दृष्टीने व्यवहार्य ठरणारा पर्याय स्वीकारता येऊ शकतो आणि उड्डाणपूल पाडण्याचा अघोरी प्रकारही थांबवता येऊ शकतो, असे मोरे यांनी स्पष्ट केले.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.