https://images.loksatta.com/2020/05/new-vidulatta.jpg?w=830

जैन धर्म व तत्त्वज्ञानाच्या गाढ्या अभ्यासक विद्युल्लता शहा यांचे निधन

महाकवी कालिदास संस्कृत पुरस्कारासह अन्य पुरस्कार मिळाले होते

by

जैन धर्म व तत्त्वज्ञानाच्या गाढ्या अभ्यासक, ज्येष्ठ संस्कृत पंडिता विद्युल्लता हिराचंद शहा (वय ९७) यांना बुधवारी आत्मध्यानपूर्वक समाधीमरण आले. त्यांच्या पार्थिवाचा कारंबा नाका स्मशानभूमीत अंत्यविधी संपन्न झाला.

सोलापुरातील श्राविका आश्रम शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा, जीवराज ग्रंथमालेच्या विश्वस्त असलेल्या विद्युल्लता शहा यांनी आयुष्यभर ब्रह्मचर्य व्रताचा स्वीकार करून पद्मश्री पंडिता सुमतिबाई शहा यांच्या मार्गदर्शनाखाली श्राविका शिक्षण संस्थेच्या कार्याला वाहून घेतले होते.

उमाबाई श्राविका कन्या प्रशालेच्या पहिल्या मुख्याध्यापिका-प्राचार्यापदापासून ते संस्थेच्या अध्यक्षपदापर्यंतच्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या होत्या. त्या ज्येष्ठ संस्कृत पंडिता होत्या. जैन धर्म व तत्वज्ञानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांना महाकवी कालिदास संस्कृत पुरस्कारासह अन्य पुरस्कार मिळाले होते. करोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक अटींचे पालन करीत विद्युल्लता यांना अंतिम निरोप देण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव हर्षवर्धन शहा यांच्यासह विश्वस्त अतुल शहा, अंजली शहा, डॉ. महावीर शास्त्री, शिरीष शहा, गिरीश शहा, राखी देशमाने आदींनी दिवंगत विद्युल्लता शहा यांना श्रध्दांजली अर्पण केली.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.