https://images.loksatta.com/2020/05/new-majoor.jpg?w=830

वर्धा : ‘युथ फॉर चेंज’ तर्फे सफाई कर्मचाऱ्यांना धान्य वाटप

जानेवारीपासून वेतन मिळालेले नसल्याने परिस्थिती झाली होती बिकट

by

करोना लॉकडाउनमुळे वर्धा नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील सफाई कर्मचारी अडचणीत असल्याचे पाहून ‘युथ फॉर चेंज’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आज त्यांना धान्याचे किट देऊन  दिलासा दिला.

नगरपालिकेचा बोरगाव येथे घणकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे. त्या ठिकाणी काम करणाऱ्या ६५ कर्मचाऱ्यांची स्थिती सद्यस्थितीत हलाखीची असल्याची माहिती ‘युथ फॉर चेंज’ स्वयंसेवी संस्थेचे गुरूराज राऊत व तुषार उमाळे यांना मिळाली. यानंतर संघटनेने आज प्रकल्पस्थळी जावून या सर्व कर्मचाऱ्यांना कुटुंबासाठी अन्नधान्याचे किट दिले.

या कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून वेतन मिळालेले नाही. रोजंदारीवर काम करणऱ्या या कर्मचाऱ्यांना इतरत्र शोधाशोध करूनही काम मिळालेले नाही. संपूर्ण शहर स्वच्छ ठेवून जनतेला आरोग्य सुरक्षा पुरवणाऱ्या या कर्मचाऱ्यांना दिलासा देणे आवश्यक होते, असे गुरूराज राऊत यांनी सांगितले.

शहरातून येणारी घाण या प्रकल्पात जमा होते, या ठिकाणी त्यावर प्रक्रिया केल्या जाते. या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना धान्याची मदत मिळाल्याने दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांच्यातून व्यक्त होत आहे. या मदतीसाठी शिवाजी चौधरी, डॉ. सचिन पावडे, प्रसाद कडे, सारंग उमाटे, हनुमान आत्राम आदींचे सहकार्य लाभले.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.