लॉकडाउनमध्ये घरगुती हिंसेवर डॉक्टर डॉन सांगतोय त्याचा फंडा !!
देवदत्तने घरगुती हिंसेवर कविता केली आहे.
by लोकसत्ता ऑनलाइनकरोना आणि सुरु असलेला लॉकडाउन आता लोकांना सवयीचा झाला आहे. अर्थात लवकरच हे सर्व संपेल आणि एक नवीन आनंदी सुरुवात सर्वांनाच करायला मिळेल. अनेक नवीन चांगल्या गोष्टी सुरु होतीलच. मात्र त्यासाठी आताच्या कठिण काळात सर्वांनीच एकमेकांशी चांगले वागणे महत्वाचे आहे. लॉकडाउन आणि वर्क फ्रॉम होममुळे कौटुंबिक हिंसाचार दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळते. यावर ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेतील अभिनेता देवदत्त नागेने एक विशेष कविता केली आहे.
देवदत्तने अगदीच हलक्या फुलक्या अंदाजात या लॉकडाउनमध्ये घरात अडकलेल्या जोडप्यावर कविता केली आहे. तुम्हालाही ती कविता आवडेल…
हि श्टोरी हाये घरात अडकलेल्या एका जोडीची खरंतर काही घरातल्या डोमेस्टिक वोईलन्स ची
सर्वाना माहीतेय की जगात सर्वत्र पसरला आहे करोना
पण आपल्या या काही जोडीचं मात्र रोजच चालू आहे रोना नि धोना..
पण इलाज काय? ह्यांचं मॅटर म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना…
पण डॉक्टर डॉन म्हणतो हा लय महत्वाचा हाये टाईम…
जर समजून नाय घेतलं एकमेकांना, तर व्हावं लागेल दूर एकमेकांपासून टोटल क्वारंटाइन .
आता लग्न केलंत तर प्रेम पण करायचं लय , काळजी घ्यायची भारी…
करोनाशी लढायची करायची एकत्र तयारी..
अहो घ्या सबुरीने सध्या, सरकार करतेय त्यांचं काम ते आपलं काम थोडं हाये..
मग देवा भाई तुम्हाला पण बोलेल , श्रीखंड लय गोड हाये…
देवा भाई बोलतो घरात नाय नडायचं , मॅटर करा सर्व क्लोज..
ही वेळ आहे एकमेकांना सांभाळायची , भांडण काय हे संपल्यावर करू शकता दररोज !
घरात रहा सेफ , कारण बाहेर पडला तो खपला..
प्रेम करा , टेक केअर करा आणि बघा झी युवा आपला !
झी युवा वाहिनीवरील देव त्त नागेची ‘डॉक्टर डॉन’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतर असल्याचे दिसत आहे. डॉक्टर डॉन आणि त्याची डार्लिंग डीन ही दोन्ही पात्र अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरली आहेत. विनोदी पद्धतीने एका डॉनचं आयुष्य या मालिकेतून मांडण्यात आले आहे. या मालिकेत देवदत्त नागेसोबत श्वेता शिंदे मुख्य भूमिकेत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.