https://images.loksatta.com/2020/04/police-and-corona-2.jpg?w=830
प्रतिकात्मक छायाचित्र

Coronavirus: चोवीस तासात ७५ पोलिसांना करोनाची लागण; एकूण संख्या १९६४ वर

करोनाशी लढताना करोनाची लागण रोखणं हे पोलिसांसमोरील मोठं आव्हान

by

राज्यात गेल्या चोवीस तासात तब्बल ७५ पोलिसांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. करोनाशी लढताना या साथीच्या आजाराची लागण रोखणं हे महाराष्ट्र पोलिसांसमोरील सर्वात मोठं आव्हान आहे.

गेल्या चोवीस तासात भर पडलेल्या पोलिसांच्या रुग्णसंख्येमुळं राज्यातील एकूण करोनाबाधित पोलिसांची संख्या १९६४वर पोहोचली आहे. तर एकूण २० पोलिसांचा आजवर करोनामुळं मृत्यू झाला आहे. तर एकूण ८४९ पोलीस या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर १०९५ पोलीस रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.