https://images.loksatta.com/2020/05/raina-sad.jpg?w=830
सुरेश रैना (प्रातिनिधिक फोटो)

“…अन भर मैदानात तो माझ्यावर प्रचंड संतापला”

रैनाने सांगितला IPL मधील प्रसंग

by

भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या IPL स्पर्धेच्या २०१० च्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाला पराभूत करून चेन्नई सुपर किंग्ज संघाने विजेतेपद पटकावले. उत्तम फलंदाज आणि भेदक मारा करणारे गोलंदाज असा समतोल संघ असणाऱ्या चेन्नईने संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केली. चेन्नईच्या संघात असलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान डावखुरा गोलंदाज डग बॉलिंजर याने त्या हंगामात उत्तम गोलंदाजी केली. त्याच्याबाबत चेन्नईचा तडाखेबाज फलंदाज सुरेश रैना याने एक आठवण सांगितली.

असा घडला प्रसंग

“डग बॉलिंजरसोबत घडलेला प्रकार मला अजूनही आठवतो. त्यावेळी त्याने केलेल्या केश प्रत्यारोपण (hair transplant) प्रक्रीयेमुळे तो बराच चर्चेत होता. २०१० च्या हंगामात डग बॉलिंजरने गांगुलीला एका सामन्यात पायचीत केले. त्यावेळी आम्ही सारे गडी बाद झाल्याचा आनंद साजरा करायला बॉलिंजरच्या जवळ गेलो. आनंद साजरा करताना मी त्याचे केस खेचून पाहण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी हा सगळा प्रकार घडला”, असे रैनाने सांगितले.

“मी त्याचे केस ओढले त्यामुळे बॉलिंजर माझ्यावर प्रचंड संतापला. तो मला सरळ म्हणाला की माझ्या केसांना हात लावायचा नाही. या केसांची निगा राखण्यासाठी मी किती कष्ट घेतो हे तुला माहितीही नाही. मी त्यावेळी काहीसा घाबरलो होतो. त्या प्रकारानंतर जेव्हा तो गडी बाद करायचा, तेव्हा मी त्याच्या अजिबात जवळ जायचो नाही. लांबूनच सेलिब्रेशन करायचो”, असं रैना म्हणाला.

https://www.loksatta.com/wp-content/plugins/a3-lazy-load/assets/images/lazy_placeholder.gif
https://images.loksatta.com/2020/05/raina-bollinger-hair-pull.jpg

रैनाने बॉलिंजरचे केस ओढले तेव्हाचा क्षण

२०१० च्या हंगामाचा अंतिम सामना नवी मुंबईतील डॉ. डी वाय पाटील स्टेडियममध्ये झाला होता. त्या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करत ५ बाद १६८ धावा केल्या होत्या. रैनाने ३५ चेंडूत नाबाद ५७ धावा ठोकल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाला ९ बाद १४६ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे मुंबईचा २२ धावांनी पराभव झाला होता. रैनाला सामनावीर घोषित करण्यात आले होते, तर संपूर्ण स्पर्धेत ६१८ धावा करणाऱ्या सचिनला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा किताब देण्यात आला होता.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.