https://images.loksatta.com/2020/05/pun55.jpg?w=830

खगोलीय क्षणिक विस्फोटाच्या उत्सर्जनाचा वेग मोजण्यात यश

आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञांच्या गटाचे महत्त्वपूर्ण संशोधन

by

आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञांच्या गटाचे महत्त्वपूर्ण संशोधन

पुणे : पृथ्वीपासून सुमारे ५० कोटी प्रकाशवर्षे दूर अंतरावर एका गूढ खगोलीय क्षणिक विस्फोटातील उत्सर्जनाचा वेग मोजण्यात खगोलशास्त्रज्ञांच्या गटाला यश आले आहे. अतिशय दुर्मीळ अशा या घटनेच्या संशोधनामुळे येत्या काळात ताऱ्याचा मृत्यू, नवतारा (सुपरनोव्हा) यांसह अनेक खगोलीय घटकांवर नव्याने प्रकाश पडू शके ल.

या संशोधनाविषयीची माहिती मंगळवारी झालेल्या ऑनलाइन पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी के ंद्राचे संचालक यशवंत गुप्ता, संशोधक प्रा. पूनम चंद्रा, डॉ. ए. जे. नयना, अमेरिके तील नॉर्थवेस्ट युनिव्हर्सिटीच्या डॉ. डियनी कॉपजान्स, डॉ. आर माग्रुट्टी आदींनी सहभाग घेतला. या शोधाविषयीचे संशोधन द अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्सच्या जूनच्या अंकात प्रसिद्ध होणार आहे. अतिशय दुर्मीळ अशा या खगोलीय स्फोटाचे नामकरण फास्ट ब्लू ऑप्टिकल ट्रान्सियंट (एफबीओटी) असे करण्यात आले होते. त्यातून बाहेर पडणाऱ्या प्रारणांचा वेग मोजण्यासाठी जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी), कार्ल लान्स्की व्हेरी लार्ज अ‍ॅरे, चंद्रा क्ष किरण दुर्बीण यांचा वापर करण्यात आला होता. त्यातील कमी कंप्रतेच्या लहरीच्या मदतीने या उत्सर्जनाचा वेग मोजण्यात आला असता तो प्रकाशाच्या वेगाच्या चाळीस टक्के दिसून आला. अतिशय शक्तिमान असा ऊर्जास्रोत असलेल्या खगोलीय स्फोटातील उत्सर्जनाचे मापन करण्याची ही कामगिरी महत्त्वपूर्ण आहे.

साधारण नवतारा ज्या स्फोटातून निर्माण होतो, त्यापेक्षा जास्त मोठा असा हा स्फोट २०१६ मध्ये समजला होता. त्यातील उत्सर्जनांचा अभ्यास क्ष किरण, अतिनील किरण, रेडिओ तरंगलांबी यांच्या माध्यमातून करण्यात आला.

नंतर या स्फोटातून निर्माण झालेला प्रकाश कमी होत गेला. या स्फोटाचे नाव काऊ असे ठेवण्यात आले होते. खगोलवैज्ञानिकांनाही धक्का बसण्याइतके  या स्फोटाचे गुणधर्म वेगळे होते. नंतर त्या स्फोटाचे वर्गीकरण फास्ट ब्लू ऑप्टिकल ट्रान्सियंट (एफबीओटी) असे करण्यात आले. हा स्फोट सकृदर्शनी अतिनवताऱ्यासारखा होता. त्याचा रंगही प्रमाणित स्फोटापेक्षा वेगळा होता. हे स्फोट गॅमा किरण स्फोटांपेक्षाही व्यापक स्वरूपाचे असतात.

पण एफबीओटी हा स्फोट या गॅमा रे स्फोटांपेक्षा वेगळा होता. कारण त्याच्याभोवती हायड्रोजनसारखी मूलद्रव्ये मोठय़ा प्रमाणात होती. आपल्याला माहिती असलेले असे प्रखर स्वरूपाचे  तीन एफबीओटी एकमेकांशी  नाते सांगणारे आहेत. त्यांची प्रखरता खूप मोठी असून त्यांचा अभ्यास विविध तरंगलांबीचा वापर करून केला गेला आहे,  अशी माहिती पूनम चंद्रा यांनी दिली.

स्फोटातून मोठय़ा प्रमाणात द्रव्य अवकाशात फेकले गेले त्याचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी होता. सूर्याच्या दशलक्षांश वस्तुमान त्यातून बाहेर फेकले गेले. आता पुढील काळात या विषयी अधिक संशोधन करून अशा स्फोटांचा अभ्यास के ला जाणार आहे.

डियनी कॉपजीन्स, संशोधक

अतिशय मूलभूत स्वरूपाचे असे हे संशोधन आहे. क्षणिक विस्फोट झालेला घटक तारा आहे, की कृ ष्णविवर आहे याचा आता अभ्यास करण्यात येईल. या विस्फोटातून उत्सर्जन झालेल्या हायड्रोजनचे नेमके  प्रमाण मोजण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच या संशोधनामुळे नवीन खगोलीय गूढ उकलण्याची शक्यता आहे.

– प्रा. पूनम चंद्रा, संशोधक

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.