https://images.loksatta.com/2020/05/corona-1-1.gif?w=830
संग्रहित छायाचित्र

रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुळे पाचवा मृत्यू; बाधितांच्या संख्येतही वाढ 

सुरूवातीपासूनच्या एकूण रुग्णांची संख्या १७५ वर

by

मुंबईहून संगमेश्वमध्ये परतलेल्या करोनाबाधित चाकरमान्यांचे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात मंगळवारी निधन झाले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधित मृतांची संख्या पाच झाली आहे.

जिल्ह्यातील संशयित करोना रूग्णांच्या मंगळवारी सायंकाळी आलेल्या १७ चाचणी अहवालांपैकी कामथे येथील ६, तर राजापूर येथील ८ रुग्ण पॉझिटीव्ह आहेत. त्यामुळे सुरूवातीपासूनच्या एकूण रुग्णांची संख्या १७५ वर पोचली आहे.

मुंबई येथून १८ मे रोजी आलेल्या एका पुरूष रुग्णाचा (वय ६१ वर्षे ) मंगळवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णाला १९ मे रोजी देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

करोनाशी निगडीत आजाराची लक्षणे आढळल्यामुळे पुढील उपचारांसाठी रत्नागिरीत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले गेले. २१ मे रोजी हा रुग्ण करोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. त्या रुग्णास अर्धाग वायूचाही त्रास होता. संगमेश्वर तालुक्यातील हा पहिला बळी आहे. जिल्ह्यात एकूण करोनाबाधित रुग्ण १७५ असून त्यातील १०३ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ही परिस्थिती असली तरीही मुंबईतून रत्नागिरीत येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढतच आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत घरीच विलगीकरण करून ठेवलेल्या व्यक्तींची संख्या ८१ हजार २२७ असून संस्थात्मक विलगीकरणात १९३ जण आहेत. तसेच ३३७ चाचणी अहवाल प्रलंबित आहेत. त्यातील बहुतेक संशयित रूग्ण कंटेनमेंट झोनमधून आलेले असल्यामुळे पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, करोनाबाधित रुग्णांचा संपर्क आल्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील नरबे, संगमेश्वर तालुक्यातील परचुरी, निवे बुद्रुक, मानसकोंड, वांझोळे, वाशी तर्फे देवरुख आणि पांगरी ही गावे विषाणूबाधित क्षेत्र घोषित करण्यात आली आहेत.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.