https://images.loksatta.com/2020/05/Train.jpg?w=830

रेल्वे प्रवासादरम्यान सुखरुप प्रसूती  

पुरुष रेल्वे कर्मचाऱ्यांनी सहप्रवाशाच्या मदतीने या महिलेला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

by

नागपूर : टाळेबंदीत गुजरातमध्ये दोन महिन्यांपासून अडकून पडलेल्या ओडिशाच्या बिष्णू संज्या साहू (३८)रा. बरिदागंजम या गर्भवती महिलेला रेल्वे प्रवासदरम्यान प्रसूती कळा सुरू झाल्या. पण महिला कर्मचारी नसतानाही कर्तव्यावरील पुरुष कर्मचाऱ्यांनी तातडीने तिला  रुग्णालयात पोहोचवले. रुग्णालयात महिलेने एका सदृढ बाळाला जन्म दिला. ही घटना मंगळवारी पहाटे ४.५० वाजता मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकात घडली.

सुरतहून ओडिशातील ब्रम्हपूरकडे निघालेल्या श्रमिक विशेष रेल्वेतून ही महिला प्रवास करीत होती. महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. तिच्यासोबत असलेल्या एका नातेवाईकाने तिकीट  तपासनीस सुनील कुमार यांना कळविले. त्यांनी स्थानक उपव्यवस्थापक मनीष गौर यांना ही बाब सांगितली आणि गाडी थांबविण्यात आली. पुरुष रेल्वे कर्मचाऱ्यांनी सहप्रवाशाच्या मदतीने या महिलेला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.