सुशोभीकरणाची कामे थांबविण्याचा आयुक्तांचा निर्णय
महापालिके च्या पथ विभागाने तीन रस्ते आणि काही चौकांचे सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव मान्य के ला होता.
by लोकसत्ता टीमपुणे : करोना संसर्गाच्या संकटाचा महापालिके च्या उत्पन्नावर थेट परिणाम होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे खर्चाच्या प्रस्तावांचा प्राधान्यक्रम ठरविला जात आहे. त्यानुसार रस्ते आणि चौक सुशोभीकरणाची कामे थांबविण्याचा निर्णय महापालिके ने घेतला आहे, तसे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
करोना संकटामुळे शहरातील व्यवहार ठप्प झाले आहेत. बांधकामे थांबली असून मिळतकरातूनही महापालिके ला सध्या अपेक्षित उत्पन्न तिजोरीत जमा झालेले नाही. वस्तू आणि सेवा कर विधेयकापोटी मिळणारे अनुदानही प्रलंबित असून बांधकाम विकास शुल्क आणि मिळकतकरातून मिळणारे उत्पन्नही कमी आहे. त्यामुळे महापालिके चा आर्थिक डोलारा ढासळण्यास सुरुवात झाली आहे. ही परिस्थिती असतानाही महापालिके च्या पथ विभागाने तीन रस्ते आणि काही चौकांचे सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव मान्य के ला होता. मात्र सुशोभीकरणाच्या कामांची गरज नसल्याचे सांगत आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही कामे थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. चाळीस लाखाहून अधिक रकमेची ही कामे प्रस्तावित होती.
फग्र्युसन महाविद्यालय रस्ता, आंबेगाव दत्तनगर, कात्रज गावठाण या भागातील चौकांचे सुशोभीकरण, कोंढवा खुर्द-मीठानगर तसेच रामटेकडी-सय्यदनगर प्रभागातील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती तसेच कोंढवा खुर्द-मीठानगर येथील चौकांचे सुशोभीकरण या कामांसाठी निविदा काढण्यात आली होती. महापालिके च्या मंजूर अंदाजपत्रकातील ही कामे असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता.
आरोग्य सेवकांना मास्क, संरक्षक साधने यांची नितांत आवश्यकता भासत आहे. त्यामुळे महापालिके ने कं पन्या, संस्था, संघटना, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था यांनी आरोग्य तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना साहित्य पुरविले जावे, असे आवाहन के ले आहे. एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला महापालिके चाच एक विभाग या परिस्थितीमध्ये लाखो रुपयांची उधळपट्टी करत असल्याचे पुढे आले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.