जूनच्या सुरूवातीला मोसमीपूर्व पाऊस
सर्वसाधारणपणे राज्यात ११ जूनला पावसाची सुरुवात
by लोकसत्ता टीमराज्यात सर्वत्र मोसमीपूर्व पाऊस १ आणि २ जूनला कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच राज्यात पाऊस सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक असेल. यावर्षी सर्वसाधारणपणे राज्यात ११ जूनला पावसाची सुरुवात होईल. त्याचा परतीचा प्रवास नेहमीपेक्षा थोडा रेंगाळून ८ ऑक्टोबरला सुरु होण्याची शक्यता आहे. अल निनोचा प्रभाव पावसावर पडणार नसल्याचे हवामान विभागाने सांगितले. यावर्षी मराठवाडय़ात सर्वसामान्य तर विदर्भात सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.