१६२१ धारावीकर करोनाग्रस्त
माटुंगा लेबर कॅम्प परिसर अत्यंत धोकादायक
by लोकसत्ता टीमकरोनाच्या संसर्गाने थैमान घातल्यामुळे धारावीकर प्रचंड घाबरले असून धारावीतील अनेक कामगारांनी गावची वाट धरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याच वेळी मंगळवारी ३८ धारावीकरांना करोनाची बाधा झाली असून आतापर्यंत करोनाची बाधा झालेल्या धारावीकरांची संख्या १६२१ वर पोहोचली आहे. तर येथील माटुंगा लेबर कॅम्प परिसर अत्यंत धोकादायक बनू लागला आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये करोनाचे थैमान सुरू आहे. येथील रुग्ण दुप्पट होण्याचा काळ २१ दिवसांवर आला आहे. मात्र असे असले तरी दररोज धारावीकरांना करोनाची बाधा होतच आहे. मंगळवारी ३८ जणांना करोनाची बाधा झाली. त्यामुळे धारावीतील करोनाबाधितांची संख्या १६२१ वर पोहोचली. आतापर्यंत धारावीमध्ये ५९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. धारावीजवळच्याच माहीम परिसरातही मंगळवारी २४ जणांना करोनाची बाधा झाली. त्यामुळे या भागातील बाधित रुग्णांची संख्या ३७५ वर पोहोचली आहे. तसेच दादरमध्ये सहा जणांना करोनाची बाधा झाली असून येथील रुग्णसंख्या २४५ वर पोहोचली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.