https://images.loksatta.com/2020/05/ashok-chavan-1.jpg?w=830

करोनावरील उपचारांसाठी अशोक चव्हाण यांना लिलावती रुग्णालयात केलं दाखल

करोनाची लागण झालेले ठाकरे सरकारमधील दुसरे मंत्री

by

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशोक चव्हाण यांच्या निकटवर्तीयाने पीटीआयला ही माहिती दिली. सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्रीपद त्यांच्याकडे आहे.

Covid-19 वरील उपचारासाठी त्यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी ठाकरे सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना करोना व्हायरसची लागण झाली होती. काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाली. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

मराठवाडयात नांदेडला परतण्याआधी अशोक चव्हाण मुंबईत काही बैठकांना उपस्थित होते. अशोक चव्हाण यांना विशेष रुग्णवाहिकेतून मुंबईला आणण्यात आलं. “अशोक चव्हाण यांच्यामध्ये करोनाची लक्षण आढळून आल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांना पुढील उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे” अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयाने दिली. जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा करोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन आठवडयाच्या उपचारानंतर ते करोनामुक्त झाले, त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.