https://images.loksatta.com/2020/04/Badlapur.jpg?w=830

बदलापूरमध्ये आढळले १३ करोनाबाधित रुग्ण, आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू

बहुतांश रुग्ण हे याआधी करोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात

by

ठाणे जिल्ह्यातील महत्वाचं शहर मानल्या जाणाऱ्या बदलापूर शहरातील करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात चालली आहे. सोमवारी आणखी १३ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे शहरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात असलेल्या शहरात आतापर्यंत १७४ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. चिंतेची बाब म्हणले, गेल्या काही दिवसांत ज्या रुग्णांचे अहवाल पॉजिटीव्ह येत आहेत त्यातली बहुतांश लोकं ही याआधी करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेली होती.

सोमवारी आढळलेल्या १३ रुग्णांपैकी ९ रुग्ण हे याआधी करोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आलेले होते. तर उर्वरित व्यक्ती या मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी कामाला ये-जा करत असतात. आतापर्यंत शहरात ७ जणांनी आपले प्राण गमावले असून, अद्याप २९ जणांचे अहवाल येणं बाकी असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. बदलापुरातील रुग्णांवर शहरातील रुग्णालयासह, उल्हासनगर, ठाणे, मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शहरातील ५० पेक्षा जास्त रहिवासी संकुलं प्रतिबंधीत केली आहेत.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.