https://images.loksatta.com/2020/05/Ajwain-Carom-Seeds-ova.jpg?w=830
Photo Via Indian Express (Photo: Thinkstock Images)

ओव्याचे सात फायदे; लहान मुलांपासून वयस्करांपर्यंत सर्वांसाठीच गुणकारी

जाणून घ्या ओवा या घरगुती पाचक औषधांचे सात उपयोग

by

‘ज्याचे पोट दुखेल तो ओवा मागेल!’ अशी म्हण आहे. खरं तर पचनाच्या सर्व तक्रारींवर ओवा उत्तम गुणकारी आहे. याच घरगुती पाचक औषधांचे सात उपयोग आपण जाणून घेणार आहोत.

१)
अर्धा चमचा ओवा + चिमुटभर सैंधव रात्री झोपताना कोमट पाण्याबरोबर घ्यावा. त्यामुळे अपचन,  शौचाला साफ न होणे, पोट दुखणे, सतत पोट फुगणे या तक्रारी जातात.

२)
लहान मुलांचे पोट दुखत असेल तर ‘ओवा अर्क’ कोमट पाण्याबरोबर पोटात द्यावाच, पण बेंबीभोवती गोलाकार चोळून पोट शेकवावे. पोटदुखी लगेच थांबते. कृतीजंतही कमी होतात.

३)
जेवल्यावर पोटात जळजळत असेल तर ओवा, बडीशेप, ज्येष्ठमध यांची सुपारी चावून खावी.

नक्की वाचा >> टाचांच्या भेगांपासून ते मासिक पाळीसंदर्भातील उपचारांपर्यंत… जाणून घ्या कढीपत्त्याचे १५ हून अधिक फायदे

४)
दूध पचत नसेल तर, दूध प्यायल्यावर चिमूटभर ओवा चावून खावा किंवाा बऱ्याच जणांना गहू पचत नाही, अशांनी कणकेत थोडी ओव्याची पावडर घालून पोळी खावी. गहू पचेल.

५)
लघवीला फार वेळा होत असल्यास गूळ व ओवाचूर्ण समप्रमाणात घेऊन वाटाण्याएवढय़ा गोळय़ा करून चार-चार तासांनी खाव्यात.

६)
रात्री अंथरूणात लघवी करणाऱ्या मुलांनाही हरभऱ्याच्या डाळीएवढी ओवा गुळाची गोळी रात्री झाोपताना खायला द्यावी.

नक्की वाचा >> रक्त शुद्धीकरणापासून ते वजन कमी करण्यापर्यंत… बडीशेपचे ‘हे’ आठ फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

७)
ओवा नेहमी थोडासाच चावून पाण्याबरोबर गिळावा, अन्यथा तोंड येते.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.