नापाक हरकतींमुळे सीमेवर पाकिस्तानला नाही दिली मिठाई
ईदच्या निमित्ताने मिठाईची देवाणघेवाण करण्याच्या परंपरेला छेद
by लोकसत्ता ऑनलाइनकरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर आज देशात सर्वत्र ईद साजरी होत आहे. ईदच्या निमित्ताने सीमेवर मिठाई देण्याची पद्धत आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांकडून मिठाईची देवाणेघेवाण करण्याची पद्धत आहे. पण यंदा या परंपरेत खंड पडला. बीएसएफ म्हणजेच सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तानी रेंजर्समध्ये मिठाईची देवाणघेवाण झाली नाही.
यापूर्वी सुद्धा मिठाई देण्याच्या परंपरेत खंड पडला आहे. याला कारण आहे, पाकिस्तानचा कुरापतखोर स्वभाव. सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन, दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत असे प्रकार केले जातात. त्याशिवाय काश्मीर खोऱ्यात दहशतवाद पसरवण्यासाठी पाठबळ दिले जाते.
पाकिस्तानच्या या नापाक हरकतीमुळे सध्या दोन्ही देशांमध्ये मोठया प्रमाणावर तणाव आहे. त्यामुळेच यंदा मिठाई देण्यात आली नाही. पण बांगलादेश सीमेवर मात्र परंपरेप्रमाणे मिठाईची देवाणघेवाण करण्यात आली. स्वांतत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन , दिवाळी किंवा महत्त्वाच्या दिवशी दोन्ही सीमा दलाकडून मिठाईची देवाणघेवाण होते
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.