“असा कचरा ब्रह्मांडात पसरवू नका”; लहान मुलांच्या तस्करीच्या आरोपांवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया
अभिनेत्रीवर केला जातोय लहान मुलांच्या तस्करीचा आरोप
by लोकसत्ता ऑनलाइनहिलेरी डफ हॉलिवूड सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. आपल्या जबरदस्त अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रीवर चक्क लहान मुलांच्या तस्करीचे आरोप केले जात आहेत. सोशल मीडियावरव्दारे केल्या जाणाऱ्या या आरोपांवर हिलरीने संताप व्यक्त केला आहे. असा कचरा ब्रम्हांडात पसरवू नका असा सल्ला तिने ट्रोलर्सला दिला आहे.
“सध्या प्रत्येक जण वैतागला आहे. परंतु असे आरोप करणं घृणास्पद आहे. ज्या कुठल्या व्यक्तीने अशा प्रकारचं स्वप्न पाहिलं आणि खोट्या बातम्या ब्रह्मांडात पसरवल्या त्यांनी आपल्या फोनपासून थोडा ब्रेक घ्यायला हवा.” अशा आशयाचं ट्विट हिलेरी डफने केलं आहे.
प्रकरण काय आहे?
हिलरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. अलिकडेच हिलरीने आपल्या आठ वर्षांच्या मुलाचा एक नग्न फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोमुळे तिच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती. दरम्यान ती लहान मुलांची तस्करी करते अशा प्रकारचे आरोपही करण्यात आले होते. या आरोपांवर आता हिलरीने प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.