देवोलिनाला बसला ट्रोल करण्याचा फटका; अभिनेत्याने केला सायबर क्राइमचा आरोप
बिग बॉसमधील भांडण पोहोचले सायबर क्राईम ऑफीसमध्ये
by लोकसत्ता ऑनलाइन‘बिग बॉस’ संपलं तरी या रिअॅलिटी शोमधील स्पर्धकांची भांडण मात्र अद्याप थांबलेली नाहीत. या शोमधील कलाकार दररोज कुठल्या ना कुठल्या कारणावरुन सोशल मीडियावर वाद विवाद करताना दिसतात. परंतु आता हा वाद थेट सायबर क्राईमच्या दरवाज्यापर्यंत पोहोचला आहे. अभिनेता मयुर वर्मा याने देवोलिना विरोधात सायबर क्राईम अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
गेल्या काही दिवसांत मयुरला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. त्याला ट्रोल करण्यात आलेल्या प्रत्येक पोस्टवर देवोलिनाने ने लाईक केलं आहे. शिवाय काही पोस्ट तिने शेअर देखील केल्या. तिची ही कृती मयुरला आवडली नाही. त्यामुळे त्याने देवोलिना विरोधात सायबर क्राईम अंतर्गत तक्रार केली आहे. देवोलिना त्याची पब्लिक इमेज खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्याने केला आहे.
देवोलिना आणि मयुरचे भांडण कधी सुरु झालं?
शेहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांचं ‘भुला दुंगा’ हे गाणं अलिकडेच प्रदर्शित झालं होतं. या गाण्याची देवोलिनाने खिल्ली उडवली होती. तिचं हे कृत्य मयुरला आवडले नाही. कारण शेहनाज त्याची मैत्रीण आहे. अखेर दोघांमध्ये ट्विटर वॉर सुरु झालं. आता हे वॉर सायबर क्राईमच्या दवरवाज्यावर पोहोचलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.