https://images.loksatta.com/2020/05/vaccine-1.jpg?w=830

करोनावर ‘स्वदेशी’ लस इतक्यात नाही, अजून लागेल वर्षभराचा कालावधी

भारतात लस संशोधाचे सुरु आहेत १४ प्रकल्प.

by

संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या करोना व्हायरसवर प्रभावी औषध शोधून काढण्यासाठी जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. जगभरात सध्या लस संशोधनाचे एकूण १०० प्रकल्प सुरु आहेत. भारतात आयसीएमआर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड मिळून करोनाला रोखणारी लस विकसित करत आहेत.

करोना व्हायरसमधून बाजूला करण्यात आलेल्या स्ट्रेन इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या पुण्यातील नॅशनल इन्स्टियुट ऑफ वायरोलॉजी लॅबमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. या स्ट्रेन भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड म्हणजे बीबीआयएलकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- देशभरात 24 तासांत 6 हजार 977 नवे करोनाबाधित, 154 जणांचा मृत्यू

“करोना व्हायरस विरोधात लस विकसित झाल्यानंतर सर्वप्रथम आधी प्राण्यांवर चाचणी केली जाईल. त्यानंतर मानवी चाचण्या सुरु होतील. लस कितपत सुरक्षित आणि प्रभावी आहे ते या चाचण्यांमधून सिद्ध होईल. या सर्व प्रक्रियेला एक वर्ष लागेल” असे आयसीएमआरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. बीबीआयएल व्हायरसला संपवणारी लस विकसित करत आहे. ही लस टोचल्यानंतर शरीरात इन्फेक्शन विरोधात अँटीबॉडी तयार होईल.

करोना व्हायरसवरील या लस निर्मितीच्या प्रकल्पाला पीएम केअर्स फंडातून १०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. सिरम इन्स्टियुट, काडिला, इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड आणि भारत बायोटक या चार कंपन्या लस विकसित करत आहेत.

आणखी वाचा- Cornavirus : चार भारतीय लस चाचणीच्या टप्प्यात; आरोग्यमंत्र्यांची दिलासादायक माहिती

आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लसी संदर्भात काय माहिती दिली?

देशात १४ ठिकाणी करोनाविरोधातील लस शोधण्याचं काम सुरू असून त्यापैकी ४ लसींची लवकरच क्लिनिकल ट्रायल घेतलं जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी भाजपा नेते जी. व्ही. एल. नरसिम्हा राव यांच्याशी सोशल मीडियावरून संवाद साधला. पाच महिन्यांच्या आत ४ लसींचं क्लिनिकल ट्रायल केलं जाऊ शकतं, असं हर्षवर्धन म्हणाले. चर्चेदरम्यान राव यांनी करोनाच्या लसीबद्दल त्यांना माहिती विचारली.

“विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा जैव तंत्रज्ञान विभाग नियामक मंजुरी, अनुदान आणि आर्थिक अशा प्रकारे मदत करत आहे. माझ्या माहितीप्रमाणे देशातील १४ पैकी चार ठिकाणी सुरू असलेल्या लसींची येत्या चार ते पाच महिन्यात क्लिनिकल ट्रायल सुरू करण्यात येणार आहे. सध्या त्या सर्व प्री क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यावर आहेत,” असं हर्षवर्धन म्हणाले.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.