https://images.loksatta.com/2020/05/Mobile-PUBG.jpg?w=830

मोबाइल रिचार्ज करण्यासाठी आईने पैसे दिले नाही म्हणून मुलाने उचललं टोकाचं पाऊल, केलं असं काही….

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे घडली घटना

by

आईने मोबाइल रिचार्ज करण्यास नकार दिल्याने २० वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ येथे ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलाला पब्जी खेळण्यासाठी इंटरनेट हवं होतं. इंटरनेट पॅक संपल्याने तो नाराज होता. यासाठीच त्याने आईकडे इंटरनेट पॅकसाठी मोबाइल रिचार्ज करण्याची मागणी केली होती. पण आईने पैसे नसल्याचं सांगत नकार दिल्यानंतर त्याने टोकाचं पाऊल उचललं.

आणखी वाचा- धक्कादायक! १० वर्षाच्या गतीमंद बहिणीची अडचण होऊ लागल्याने मित्रांसोबत जंगलात घेऊन गेला आणि…

मिळालेल्या माहितीनुसार, बागसेवनिया येथील जुन्या वस्तीत राहणाऱ्या या तरुणाने शनिवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. इंटरनेट पॅक संपल्यानेच त्याने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. त्याने सकाळीच आईला मोबाइलचा रिचार्ज करण्यास सांगितलं. यावेळी आईने लॉकडाउन असल्याने आर्थिक समस्या असल्याचं सांगितलं. तीन महिन्यांऐवजी एका महिन्याचा रिचार्ज करुयात असं समजावण्याचा प्रयत्न केला. यावरुन तरुणाचं आईसोबत भांडण झालं. भांडणानंतर तो आपल्या खोलीत निघून गेला आणि गळफास लावून घेत आत्महत्या केली. कुटुंबियांना शेजाऱ्यांच्या मदतीने तरुणाला रुग्णालयात दाखल केलं पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.