Video : तोंडाजवळ येऊन खोकणाऱ्या शेजाऱ्यावर संतापला अभिनेता…
जाणून घ्या काय आहे प्रकरण.
by लोकसत्ता ऑनलाइनबॉलिवूड अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन वीर दासने नुकताच त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने त्याच्यासोबत गैरवर्तन केल्याचे दिसत आहे. सध्या वीर दासचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चर्चेत आहे.
व्हिडीओमध्ये वीर दासच्या शेजारी राहणारा एक व्यक्ती त्याच्या अंगावर ओरडताना दिसत असून अपशब्द देखील वापरत असल्याचे दिसत आहे. तसेच त्या व्यक्तीने तोंडावर लावलेले मास्क काढून खोकण्याचा प्रयत्न केला आहे. वीर दासने त्याच्या शेजाऱ्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर आणखी एक ट्विट करत वीर दासने घडलेला प्रकार सांगितला आहे. ‘ती खूप लक्षात राहणारी संध्याकाळ होती. मी तळमजल्यावर राहतो. आम्ही थोडावेळ घराबाहेर बसलो होतो. रात्री १० च्या सुमारास आमचा एक शेजारी तेथे आला, कारण आम्ही त्याचे जेवण बनवले होते. आम्ही कॉम्प्लेक्समध्ये असे बऱ्याचदा करत असतो. आम्ही त्यांना १५ फूट लांब बसण्यासाठी खूर्ची दिली. आम्ही सगळे सोशल डिस्टंसिंगचे पालन करत होतो. माझ्या शेजााऱ्यांनी येता ना सोबत कोल्ड्रिंगचे कॅन आणले होते आणि त्यांनी मास्क देखील लावले होते. पण नंतर त्यांनी ते धूम्रपान करण्यासाठी काढले. मी माझ्या घराच्या अंगणात बसलो होतो आणि शेजारी काही करणासाठी कॉम्प्लेक्समध्ये गेले. पाच मिनिटांनंतर ही घटना घडली’ असे वीर दासने म्हटले आहे.
‘व्हिडीओमध्ये दिसणारा हा व्यक्ती माझा घर मालक नाही. तो अॅनेक्सा बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर राहतो. त्याला मी राहत असलेल्या घराचा वारसा न मिळाल्याने तो अस्वस्थ आहे. मला नाही माहित तो व्यक्ती मला धमकावत आहे, माझ्या तोंडाजवळ खोकण्याचा प्रयत्न करत आहे किंवा त्याच्या दिवंगत आई-वडिलांची धमकी देऊन घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. पण या वेळी त्याने सर्व सीमा ओलांडल्या असे वीर दासने पुढे म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.