https://images.loksatta.com/2020/05/ramchandra-dhumal.jpg?w=830
रामचंद्र धुमाळ

ज्येष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचे निधन

फँड्री, ख्वाडा, सैराट, म्होरक्या चित्रपटांत साकारल्या दमदार भूमिका. 'सेक्रेड गेम्स'मध्येही त्यांनी साकारली होती भूमिका

by

फँड्री, ख्वाडा, सैराट, म्होरक्या यांसह जवळपास १०० चित्रपटांत भूमिका साकारणारे अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचं निधन झालं. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७१ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होती. चित्रपटांसोबत त्यांनी वेब सीरिजमध्येही भूमिका साकारल्या होत्या. ‘सेक्रेड गेम्स’मध्ये त्यांनी भूमिका साकारली होती.

अनेक मराठी, हिंदी चित्रपट, वेब सीरिज व लघुपटांमधून त्यांनी दमदार अभिनयाची छाप सोडली. ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटात त्यांची भूमिका अत्यंत छोटी होती, तरीसुद्धा ती प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. तर ‘सेक्रेड गेम्स’मध्ये त्यांनी गणेश गायतोंडेच्या (नवाजुद्दीन सिद्दिकी) वडिलांची भूमिका साकारली होती.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.