धक्कादायक! १० वर्षाच्या गतीमंद बहिणीची अडचण होऊ लागल्याने मित्रांसोबत जंगलात घेऊन गेला आणि…
मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती
by लोकसत्ता ऑनलाइनआपल्याच १० वर्षाच्या गतीमंद बहिणीवर तीन मित्रांच्या मदतीने बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जयपूरमधील मनोहरपूर येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी असणाऱ्या भावाने अडचण होत असल्याने बहिणीची मित्रांच्या मदतीने हत्या करण्याचा कट आखला होता. यासाठी १७ मे रोजी तिला एका निर्जनस्थळी नेलं होतं. पण हत्या करण्याआधी चौघांनीही तिच्यावर बलात्कार केला.
सर्व आरोपी १९ ते २१ वयोगटातील आहेत. पीडित मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तीन दिवसांनी मुलीच्या वडिलांना तिची चप्पल आणि कपडे पोलिसांकडे नेत जवळच्या जंगलाजवळ सापडल्याचं सांगितलं. यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता मुलीचा मृतदेह आढळला.
पोलिसांनी परिसरात अॅक्टिव्ह असणाऱ्या मोबाइल फोनचे नंबर मिळवले असता आरोपीचा शोध लागला. यानंतर पोलिसांना मुलीला शेवटचं तिच्या भावासोबत पाहिल्याचं सांगणारा साक्षीदारही सापडला. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं असता आरोपी भावाने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी भाऊ आणि त्याच्या तिन्ही मित्रांना अटक केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.