https://images.loksatta.com/2020/05/pmpml-1.jpg?w=830

प्रवासी सेवेचे पीएमपीकडून नियोजन

एक आड एक पद्धतीने आसन व्यवस्था

by

एक आड एक पद्धतीने आसन व्यवस्था

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील प्रवासी सेवा सुरू करण्याचे नियोजन पीएमपीकडून करण्यात आले आहे. टाळेबंदीचा चौथा टप्पा संपल्यानंतर सार्वजनिक वाहतूक सुरू करण्यास मान्यता मिळण्याची शक्यता गृहीत धरून पहिल्या टप्प्यात मर्यादित स्वरूपात आणि मर्यादित प्रवाशांसह ही वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी गाडय़ातील आसन व्यवस्था एक आड एक या पद्धतीने निश्चित करण्यात आली असून तशी रचना करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यापासून पीएमपीची सेवा बंद करण्यात आली आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली असून के वळ पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच पीएमपीची सेवा सुरू होती. टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यापासून निर्णयात शिथिलता येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अद्यापही सार्वजनिक वाहतुकीला मान्यता देण्यात आलेली नाही. मात्र टाळेबंदीचा चौथा टप्पा संपल्यानंतर प्रवासी वाहतूक सुरू करण्यात मान्यता मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सेवा सुरू करण्याचे नियोजन पीएमपीकडून करण्यात येत आहे.

प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार असली तरी प्रवासासाठी काही नियम करण्यात आले आहेत. गाडय़ांमधील आसन व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला असून के वळ २१ प्रवाशांची वाहतूक होणार आहे. एक आड एक या पद्धतीने ही आसन व्यवस्था राहणार आहे. गाडीमधील दोन्ही बाजूच्या रांगेतील दोन आसनांपैकी एक आसन रिकामे ठेवण्यात येणार आहे. प्रवासीही एकापाठोपाठ न बसता तिरक्या पद्धतीने ही आसन व्यवस्था करण्यात आली आहे. उभे राहून प्रवास करण्यासाठी के वळ तीन प्रवाशांनाच मान्यता मिळणार आहे, अशी माहिती पीएमपीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.pngलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.