जनजीवन हळूहळू पूर्वपदावर
टप्प्याटप्प्याने अर्थचक्राला गती देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
by लोकसत्ता टीमटप्प्याटप्प्याने अर्थचक्राला गती देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई : करोनामुळे अचानक टाळेबंदी लागू करणे चुकीचे होते आणि ३१ मेनंतर एकाच वेळी टाळेबंदी पूर्ण उठवणेही चुकीचे ठरेल. त्यामुळे टप्प्याटप्प्याने टाळेबंदी उठवून सावधगिरी बाळगत जनजीवन पूर्वपदावर आणून, अर्थचक्रोला गती देण्यात येईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिलासा दिला. संकटाच्या काळात राजकारण करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचा टोला भाजपला लगावत राज्याच्या जनतेचा विश्वास महाविकास आघाडी सरकारवरच असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी समाजमाध्यमाद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. ३१ मेनंतर टाळेबंदी उठणार की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. आता आपल्याला करोनासह जगायचे असेल तर सावधगिरी बाळगावी लागेल. नियम पाळून उद्योग-व्यवयास सुरू करावे लागतील. हळूहळू जनजीवन सुरळीत होईल. राज्यात आतापर्यंत ५० हजारांहून अधिक उद्योग सुरू झाले आहेत. दुकाने सुरू होत आहेत. हिरव्या क्षेत्रात बस सेवा सुरू झाली आहे. टप्प्याटप्प्याने आयुष्याची गाडी पूर्वपदावर येईल. पुढील काही दिवसांत रुग्ण वाढण्याचा धोका असला तरी राज्य सरकार त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज करत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी जनतेला आश्वस्त केले. मेअखेरीस एकटय़ा मुंबईत १४ हजार खाटा ऑक्सिजन आणि अतिदक्षता विभागाच्या सुविधांसह उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले.
करोना परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत आंदोलन करणाऱ्या भाजपला त्यांनी लक्ष्य केले. संकटाचा काळ असून कोणी राजकारण करू नये. तुम्ही के ले तरी आम्ही करणार नाही, कारण आमच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे. राज्यातील जनतेचा विश्वास महाविकास आघाडी सरकारवरच जास्त आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. के ंद्र सरकारने जीएसटीच्या परताव्याचे पैसे थकवले आहेत, इतर अनेक गोष्टींचे राज्याचे पैसे के ंद्राकडे अडकले आहे, मजुरांच्या रेल्वे प्रवासाचे ८५ टक्के शुल्क केंद्राकडून यायचे आहे हे सारे आम्हाला बोलता आले असते, त्यावरून केंद्र सरकारविरोधात ओरड करता आली असती. पण आम्ही ते के ले नाही. कारण ही ती वेळ नाही. तसे करणे ही माणुसकी नाही, असेही ठाकरे यांनी राज्यातील भाजप नेत्यांना सुनावले. खूप पॅके ज जाहीर होतात, पण आत रिकामा खोका असतो, असा टोला मुख्यमंत्र्यांनी पॅकेजची मागणी करणाऱ्या भाजप नेत्यांना लगावला. राज्यातील सर्व जनतेला महात्मा फु ले योजनेत करोनावर मोफत उपचारांचा निर्णय घेतला, शिवभोजन योजनेतून गरिबांना जेवण, रेशन दुकानांवर धान्य दिले, मजुरांच्या रेल्वे-एसटी प्रवासाचा खर्च के ला या कामांची यादीही ठाकरे यांनी वाचून दाखवली.
जूनमध्ये शाळा आणि शेतीचा हंगाम सुरू होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबणार नाही, अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबतही लवकरात लवकर निर्णय होईल, पालकांनी काळजी करू नये. शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर बी-बियाणे आणि खतांची उपलब्धता करून देण्यात येत आहे. हा एक नवा प्रयोग असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. कापसाबरोबरच मका, धानासह इतर धान्यांचीही राज्य सरकार खरेदी करत आहे, असे ठाकरे म्हणाले.
मेअखेपर्यंत महाराष्ट्रात दीड लाख करोना रुग्ण असतील, असा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त के ला होता. पण सर्वानी सावधगिरी बाळगल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आणता आली, याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले. सोमवारच्या रमजान ईदनिमित्त मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देत सर्वधर्मीयांनी आतापर्यंत घरातच सण, उत्सव आणि समारंभ साजरे केले असल्याचे सांगत घरात राहूनच नमाज अदा करण्याचे आवाहन ठाकरे यांनी के ले.
‘हव्या तेवढय़ा रेल्वेगाडय़ा उपलब्ध’
स्थलांतरित मजूरांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून कमी गाडय़ा सोडण्यात येत असल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यावर रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सोमवारपासून हव्या तेवढय़ा रेल्वेगाडय़ा उपलब्ध करून देतो, असे ट्विटरवरून स्पष्ट करून चेंडू मुख्यमंत्र्यांकडे वळवला.
राज्यात रुग्णसंख्या ५० हजारांवर
मुंबई : राज्यात रविवारी २४ तासांतील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. रविवारी ३,०४१ नवे रुग्ण आढळल्याने राज्यातील एकूण रुग्णसंख्या ५०,२३१ वर पोहोचली. राज्यभरात रविवारी करोनाने ५८ जणांचा बळी घेतला. त्यामुळे एकूण बळींची संख्या १,६३५ वर गेली. रविवारी १,१९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, राज्यात आतापर्यंत १४,६०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.