‘लोकसत्ता विश्लेषण’मध्ये उद्या अजित रानडे
‘लोकसत्ता विश्लेषण’ या उपक्रमाच्या नव्या पर्वात विख्यात अर्थविश्लेषक डॉ. अजित रानडे करणार आहेत.
by लोकसत्ता टीममुंबई : टाळेबंदीमुळे कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या आठवडय़ात विशेष मदतीची घोषणा केली. देशाचे अर्थचक्र मोठय़ा प्रमाणावर थांबलेले असताना आणि सर्वच स्तरांतील नागरिकांमध्ये भविष्याची चिंता गडद झालेली असताना आपल्यासमोर पुढील आव्हाने कोणती याची चर्चा ‘लोकसत्ता विश्लेषण’ या उपक्रमाच्या नव्या पर्वात विख्यात अर्थविश्लेषक डॉ. अजित रानडे करणार आहेत.
मंगळवारी ५ वाजता सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. प्रस्तुत या वेबसंवादाच्या माध्यमातून होणाऱ्या चर्चासत्राचा लाभ अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसह सजग आणि सुजाण नागरिकांना घेता येणार आहे.
सहभागी कसे व्हाल? http://tiny.cc/Loksatta_Vishleshan_26May या लिंकवर जाऊन नोंदणी करावी. त्यानंतर तुम्हाला ईमेल आयडीवर संदेश येईल. त्यानंतर या वेबसंवादात भाग घेता येईल. अधिक माहितीसाठी www.loksatta.com या संकेतस्थळाला भेट द्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.