कोरोनाच संक्रमण रोखण्यासाठी गंधे कुटुंबियाचं पुढाकार, मेडिकलला दिले ५०,००० रूपयाचे कोविड मास्क
by Nagpur Today, Nagpur News
नागपूर: नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असतांना दुसरीकडे या कोविड विषाणुच संक्रमण रोखण्यासाठी गंधे कुटुंब समोर आल आहे.
कोरोना महामारिच्या संकटकाळात डॉक्टर्स दिवस-रात्र परिश्रम घेत आहेत. मेडिकलला (IGMCH) थेट सहकार्य करण्याच्या उद्देशाने अमेरिकेत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत तज्ञ रेडियोलॉजीस्ट डॉक्टर आशिष गंधे, त्यांचे वडील रमेश गंधे आणि भाऊ अविनाश गंधे यांनी ५०,००० रूपयाचे कोविड मास्क भेट म्हणून मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर अविनाश गावंडे यांच्याकडे सुपुर्द केले.
यावेळी डॉक्टर शिल्पा कांजेवार, डॉक्टर मुकेश, डॉक्टर गिरीश भूयार व अन्य सहकारी यावेळी उपस्थित होते.