https://images.loksatta.com/2019/11/supreme-court-2.jpg?w=830
(संग्रहित छायाचित्र)

निर्भया प्रकरण: सुनावणी सुरु असताना न्यायमूर्तींना सुप्रीम कोर्टात भोवळ

निर्भया प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे

by

सुप्रीम कोर्टान निर्भया प्रकरणाची सुनावणी सुरु असताना न्यायमूर्ती भानुमती यांना भोवळ आली. सुनावणी सुरु असतानाच त्यांची शुद्ध हरपली. यानंतर भानुमती यांना महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या कक्षात नेण्यात आले. सुप्रीम कोर्टात ही बाब घडल्याने निर्भया प्रकरणात केंद्र सरकारवरच्या याचिकेवरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी विनय शर्मा याने आपण मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याची याचिका केली होती. मात्र विनय हा मानसिक दृष्ट्या सक्षम असल्याचं म्हणत सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली. यानंतर न्या. भानुमती या निर्भया प्रकरणातील दोषींना स्वतंत्रपणे फाशी देण्याबाबतच्या केंद्र सरकारच्या याचिकेवर सुनावणी घेत होत्या. त्यावेळीच त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना चक्कर आली.