https://images.loksatta.com/2020/01/mutual-fund.jpg?w=830

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित आहे ?

आज आपण म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक कितपत सुरक्षित आहे ते जाणून घेणार आहोत.

by

पुढच्या आठ ते १३ वर्षांसाठी मला म्युच्युअल फंडामध्ये दर महिन्याला २० हजार रुपये गुंतवायचे आहेत. म्युच्युअल फंड माझ्यासाठी नवीन आहे. तुम्ही मला एसआयपीसाठी उत्तम प्लान सुचवाल का?

म्युच्युअल फंड सुरक्षित आहे का? नऊ वर्ष सलग गुंतवणूक केल्यानंतरही गुंतवणूकदाराला नुकसान सहन करावे लागते हे मी ऐकून आहे. हे खरे आहे ? नव्याने म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या मनात असे अनेक प्रश्न असतात. गुंतवलेले पैसे बुडणार तर नाही ना. अशी भिती प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात असते आणि ती रास्तही आहे.

आज आपण म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक कितपत सुरक्षित आहे ते जाणून घेणार आहोत.

म्युच्युअल फंड्स तुम्हाला परताव्याची हमी देत नाहीत. सर्व म्युच्युअल फंड्समध्ये काही प्रमाणात धोका असतो. म्युच्युअल फंड्सच्या वेगवेगळया विभागानुसार धोक्याची ही पातळी बदलत जाते. उदहारणार्थ, डेबट म्युच्युअल फंड तुलनेने कमी धोकादायक असतात. इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये धोका जास्त असतो.

इक्विटी फंड्स काय करतात?
हे म्युचुअल फंड्स त्यांच्या निधीचा (कॉर्पस) मोठा भाग शेअर बाजारात गुंतवतात आणि त्यांच्या गुंतवणुकीचा उद्देश दीर्घकालीन भांडवलवृद्धीचा असतो. हे फंड्स अनेक प्रकारच्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करू शकतात. दीर्घकालीन दृष्टिकोन बाळगणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हे सोयिस्कर असतात.

तुम्ही म्युच्युअल फंडच्या क्षेत्रात नवीन असाल, आणि गुंतवणूकीबद्दल तुम्हाला माहित नसेल तर विश्वासू म्युच्युअल फंड अ‍ॅडव्हायजरचा सल्ला घ्या. तुम्ही तुमचे मित्र, सहकाऱ्यांकडून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकीसाठी कोण मदत करु शकते याबद्दल माहिती घ्या. तुम्ही किती गुंतवणूक करु शकता? तुमचं उद्दिष्ट काय? आणि कितपत धोका पत्करु शकता, त्या आधारावर म्युच्युअल फंडाची निवड करा. दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर, इक्विटी म्युच्युअल फंड उत्तम पर्याय आहे. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली तर, अपेक्षेपेक्षा उत्तम परतावा सुद्धा मिळू शकतो फक्त त्याची खात्री नसते.