https://images.loksatta.com/2020/02/Narendra-modi-arvinda-Kejriwal.jpg?w=830

शपथविधीसाठी केजरीवालांचे मोदींना आमंत्रण

अन्य कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यासह दिग्गज नेत्यांना आमंत्रित करण्यात आलेले नाही.

by

आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल हे रविवार १६ फेब्रवुवारी रोजी, तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतील रामलीला मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दिल्लीकर जनतेला या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. रविवारी होणाऱ्या शपतविधी सोहळ्याला केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले आहे. विशेष म्हणजे या सोहळ्याला अन्य कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यासह दिग्गज नेत्यांना आमंत्रित करण्यात आलेले नाही.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने भाजपाचा दारुण पराभव केला. दिल्लीतील ७० पैकी ६२ जागांवर विजय मिळवत आपने एकहाती सत्ता मिळवली. तर, भाजपाला अवघ्या आठ जागा जिंकण्यात यश आलं. काँग्रेसला आपलं खातं देखील उघडता आलं नसून तब्बल ६३ उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. केवळ तीन उमेदवारांनाच आपली अमानत रक्कम वाचवता आली आहे.