https://images.loksatta.com/2020/02/realme-c3-1.jpg?w=830

Realme च्या स्वस्त स्मार्टफोनची पहिल्यांदाच विक्री, मिळतील स्पेशल ऑफर्सही

फ्लिपकार्ट आणि realme.com वर सेल

by

स्मार्टफोन कंपनी रिअलमीने (Realme)काही दिवसांपूर्वीच आपला नवीन बजेट फोन Realme C3 लाँच केलाय. आज(दि.१४) पहिल्यांदाच या फोनच्या विक्रीसाठी फ्लिपकार्ट आणि realme.com या कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी १२ वाजेपासून या फोनसाठी सेलला सुरूवात झाली आहे. या सेलमध्ये फोनच्या खरेदीवर काही आकर्षक ऑफर्सही आहेत.

आणखी वाचा –  (पैसा वसूल ठरणारे आठ ‘बेस्ट’ स्मार्टफोन, किंमत १५ हजारांहून कमी) 

आणखी वाचा – (Vodafone ची भन्नाट ऑफर, रिचार्जवर मिळवा ₹2500 कॅशबॅक)

काय आहेत ऑफर्स –
प्लिपकार्ट ‘Axis बँक क्रेडिट कार्ड’द्वारे खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅक आणि ‘Axis बँक बझ क्रेडिट कार्ड’द्वारे खरेदी केल्यास 5 टक्के अतिरिक्त डिस्काउंटची ऑफर मिळेल. याशिवाय फोनच्या खरेदीवर ग्राहकांच्या सोयीसाठी नो-कॉस्ट इएमआयचाही पर्याय आहे.

फीचर्स –
Realme C3 हा फोन म्हणजे रिअलमी C2ची पुढील आवृत्ती आहे. हा फोन दोन व्हेरिअंटमध्ये (3GB रॅम + 32GB स्टोरेज आणि 4GB रॅम +64GB स्टोरेज) लाँच करण्यात आला आहे. ड्युअल रिअर कॅमेरा, MediaTek Helio G70 प्रोसेसर असलेल्या या एंट्री लेवलच्या फोनमध्ये इनबिल्ट डार्क मोड आणि रिव्हर्स चार्जिंग यांसारखे फीचर्सही आहेत. रिअलमी UIसोबत अँड्रॉइड 10 वर आधारित असलेला हा कंपनीचा पहिलाच स्मार्टफोन आहे. हा फोन केवळ Android 10 ऑपरेटिंग सिस्टिमसोबत येतो असं नाही, तर यामध्ये MediaTek Helio G70 प्रोसेसरही आहे. फोनमध्ये इनबिल्ट डार्क मोड आहे. या फोनमध्ये 6.5 इंचाचा वॉटर-ड्रॉप स्टाइल नॉच डिस्प्ले असून कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन आहे. यात ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G70 एसओसी प्रोसेसर मिळतं. 32जीबी/64जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या फोनमध्ये 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी असून रिव्हर्स चार्जिंग फीचरही आहे. फोटोग्राफीसाठी मागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप (12 + 2 MP) देण्यात आलाय, तर सेल्फीसाठी 5 मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा आहे.

रिअलमी C3 ची किंमत –
रिअलमी C3 (3GB + 32GB) व्हेरिअंटची किंमत 6,999 रुपये, तर 4GB +64GB व्हेरिअंटची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

आणखी वाचा – (मारुतीची ‘रावडी’ SUV! पहिली झलक दिसताच चर्चांना उधाण)

आणखी वाचा -(देशातील 10 सर्वाधिक Popular Cars , ‘ही’ ठरली बेस्ट ; बघा संपूर्ण यादी)

आणखी वाचा – (Kia ची जबरदस्त ‘क्रेझ’, Seltos ठरली एक नंबर SUV)

आणखी वाचा -(Mahindra चा जलवा! सिंगल चार्जमध्ये तब्बल 520 Km धावणार , 5 सेकंदात 100 चा स्पीड)